फैय्याज शेख
शहापूर : शहापूर तालुक्यातील हिव गावातून गेलेल्या मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाच्या साखळी क्रमांक ६७७ च्या हद्दीतील बांधकामामुळे ग्रामस्थांच्या दळणवळणाचा रस्ता बंद झाला आहे. हा रास्ता तोडून तीन वर्षे उलटूनही अद्याप पर्यायी रस्ता देण्यात आला नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहे. यामुळे येत्या विधानसभा निवडकुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
शहापूर (Shahapur News) तालुक्यातील हिव दोऱ्याचा पाडा या गावाचा गावगाडा रखडला आहे. मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) बांधकामामुळे ग्रामपंचायत हिव येथील वाहतुकीसाठीचा असलेला पूर्वीचा जुना रस्ता नष्ट करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना शेतीच्या कामांसाठी गावाबाहेर जाणे मुश्कील झाले आहे. गावा पलीकडे जाण्यासाठी पाण्याने वाहणाऱ्या नाल्याचा अडसर येत असून नाल्यावर साकव बांधण्यात आलेले नाही. यामुळे रहदारीचा व शेतमाल ने आण करण्याचा प्रश्न सतावत आहे.
दरम्यान पर्यायी रस्ता व्हावा; यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व नवयुगा कंपनी यांच्याकडे वारंवार मागणी करूनही समस्या सुटलेली नाही. यामुळे गावकऱ्यांची गैरसोय सुरुच आहे. समृद्धी महामार्गाची ठेकेदार असलेल्या नवयुगा कंपनीच्या व्यवस्थापकांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन पूर्वीचा जुना रस्ता जोडण्यात येईल; असे आश्वासन दिले होते. परंतु समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असतांना हिव दोऱ्याचापाडा जुन्या रस्त्याचे काम मात्र रखडले आहे. परिणामी हिव गावाचे ग्रामस्थ एकत्र येऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा तहसीलदाराना निवेदनाद्वारे दिला असल्याने खळबळ उडाली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.