Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Shahapur News : नागपूर ते मुंबई असा तयार झालेल्या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या अपघाताची मालिका संपलेली नाही. महामार्गावर अपघात होऊन यात अनेकांचे जीव गेले आहेत

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

शहापूर : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. रोज कुठे ना कुठे अपघात होत असून एका रात्रीत चार अपघात झाल्याची घटना शहापूर तालुक्यात घडल्या आहेत. शहापूर तालुक्यातील वाशेळा बोगदा ते शहापूर दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी ऐकून चार अपघात झाल्याचे झाले आहेत. सुदैवाने या अपघातांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.   

नागपूर ते मुंबई असा तयार झालेल्या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या अपघाताची मालिका संपलेली नाही. महामार्गावर अपघात होऊन यात अनेकांचे जीव गेले आहेत. तर शेकडो जण जखमी झाले आहेत. भीषण अपघातांची मालिका थांबलेली नसून रात्रीच्या सुमारास शहापूर तालुक्यात पुन्हा एकदा अपघात झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. यात अनेकजण जखमी झाले आहेत. 

समृद्धी महामार्गावर पहिला अपघात वाशेळा बोगदा जवळ पिकप टेम्पो पलटी झाला आहे. तर दूधाच्या टॅकरचा अपघात चॅनल नंबर 648 जवळ झाला. तर तिसरा अपघात कंटेनरचा झाला असून तो चॅनल नंबर 673 जवळ झाले आहेत. या सर्व अपघातांमध्ये प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहापूर तालुक्यातील हद्दीत समृद्धी महामार्गावर कसारा वाशेळा बोगदा ते शहापूर दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाले आहेत. 

रुग्णवाहिका पोहण्यास देखील अडचण 

अपघात झाल्या नंतर समृद्धी महामार्गावर चढण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने अपघात झाल्यानंतर ज्या वेळेत मदतीसाठी पोहोचले पाहिजे. त्या वेळेत मदतीसाठी पोहोचू शकत नाहीत. तर रूग्णालयात देखील पर्यायी मार्गापासून लांब असल्याने जखमीना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर ज्या ठिकाणी रुग्णालयात जवळ आहे. त्या ठिकाणी रूग्णवाहीका उतरायला जागा मिळत नाही; अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून इगतपुरी ते शहापूर दरम्यान दररोज अपघाताची मालीका सुरू आहे. या दरम्यान अपघात का होतात यांची शासनाने तपासणी करणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : तोलून मापून आणि कोणत्याही घटकाला नाराज न करता काम करणे गरजेचे, अजित पवारांचा सल्ला

Trendy Blouse Design: सणासाठी साडी नेसायची असेल तर, असे ब्लाउज आत्ताच तयार करा

Diwali 2025: नरक चतुर्दशीला कारिट फळ का फोडतात? कारणे आहे खास

Liver Detox: लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय, आरोग्य सुधारेल

Gulgule Recipe: नाश्त्याला काय करायचं सूचत नाही? ही गोड गुलगुल्यांची झटपट रेसिपी ट्राय करा

SCROLL FOR NEXT