शहापूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १८ वर्षांच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृत तरुणाच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. पण पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. या हत्येच्या घटनेमुळे शहापूरमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील वाशिंद पोलिस ठाण्यात हद्दीत असलेल्या ब्राह्मणपाडा आणि जांभूळपाडा येथील तरूणांचा काही कारणास्तव वाद झाला होता. वाद मिटविण्यासाठी ब्राह्मणपाडा येथील काही महीला आणि तरूण रात्री जांभूळपाडा येथे गेले होते. त्यावेळी जांभुळपाडा येथील तरूण आणि महिलांनी दगडाने ठेचून मिलिंद सुकऱ्या वाघे (१८ वर्षे) या तरुणाची हत्या केली.
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाचा मृतदेह ताब्याच घेतला आणि शहापूर रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. मृत तरुणाच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत मरेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पण शहापूर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तरुणाचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला. या घटनेप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात चार गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.