Shahapur Crime Saam tv
महाराष्ट्र

Shahapur Crime : शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, गुन्हा दाखल

Shahapur News : शाळेतील बारावी आणि दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुरवातीला वाद निर्माण झाला होता.

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 
शहापूर
: शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून जोरदार राडा झाला. यात काही विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्यांच्या डोक्यात गाडीच्या लोखंडी रोडने मारहाण केल्याने विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

शहापूर (Shahapur) तालुक्यातील खर्डी येथील हायस्कूलमधील हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या शाळेतील बारावी आणि दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुरवातीला वाद निर्माण झाला होता. मात्र आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर शाळेच्या बाहेर या विद्यार्थ्यांमधील वादाचे रूपांतर भांडणात झाले. या (Crime News) भांडणात दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गाडीच्या लोखंडी शॉकपने बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्यात जोरदार प्रहार केला.  

डोक्यात मर लागल्याने रक्तस्त्राव होऊ लागला. यामुळे तो विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला तत्काळ खर्डी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान खर्डी पोलिस (Police) ठाण्यात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर गेल्या काही दिवसांपासून शाळाबाहेर गांजा व नशेची पावडरची विक्री केली जात असल्याची चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्णकर्कश डीजेविरोधात पुण्यात आणखी एका आंदोलनाचे आयोजन

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदेंकडून ठाकरेंना मोठा हादरा, बड्या नेत्यासह ७ नगरसेवक हाती घेणार 'धनुष्यबाण'

Vegetable juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या या 4 भाज्यांचे ज्यूस, पोटावरची चरही मेणासारखी वितळेल

Acidity Remedies : वारंवार पित्ताचा त्रास होतोय? 'हा' १ उपाय समस्येतून करेल सुटका

Chest congestion: छातीत घट्ट पिवळा कफ साचलाय? हे 7 घरगुती उपाय करून पाहा, लगेच सैल होईल कफ

SCROLL FOR NEXT