shahaji bapu patil saam tv
महाराष्ट्र

Shahaji Bapu Patil: काय डोंगर काय झाडी, काय मारली थोबाडीत, बापूंनी स्वत:च्या थोबाडीत का मारलं? VIDEO

Shahaji Bapu Slaps Himself: काय डोंगार, काय झाडी, काय हाटील म्हणणाऱ्या शहाजी बापू पाटलांनी भरसभेत स्वतःच्याच तोंडात मारली आहे. मात्र शहाजी बापू एवढे उद्विग्न का झाले आणि त्यावर विरोधकांनी नेमक्या काय प्रतिक्रीया दिल्या आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.....

Bharat Mohalkar

हे तोंडात मारुन घेणारे आहेत..... काय झाडी, काय डोंगार, काय हाटील म्हणत राज्यभर प्रसिद्ध झालेले माजी आमदार शहाजी बापू पाटील.... शहाजी बापू पाटलांनी भर सभेत बोलताना स्वतःच्याच हाताने तोंडात मारुन घेतलंय... त्याला कारण ठरलंय... भाजप नेते रणजितसिंह निंबाळकरांचा झालेला पराभव....तोंडात मारुन घेताना शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणालेत.... पुन्हा ऐका....

लोकसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटलांना आघाडी मिळाली.. त्याबद्दल आपल्याला खंत वाटत असल्याचं शहाजी बापू पाटलांनी म्हटलंय... विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला तर फाशी घेईन, अशी शपथ शहाजी पाटलांनी घेतली होती... मात्र त्यानंतरही शहाजी पाटलांचा पराभव झाला.. आता पराभवानंतर पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या नागरी सत्कार सोहळ्यात शहाजी बापू पाटलांनी स्वतःच्याच कानाखाली मारली..त्यावर खासदार धैर्यशील मोहितेंनी खोचक टोला लगावलाय...

हे असं असलं तरी शहाजी बापू पाटलांची ही कृती पुन्हा चर्चेत येण्यासाठी आहे की खरंच उद्विग्नतेतून? याचीच चर्चा रंगलीय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT