Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्याची किंमत उद्धव ठाकरेंना चुकवावी लागणार; शहाजी बापू पाटलांची टीका

Shahajibapu Patil on Sanjay Raut : आरोग्य मंत्री डाॅ. तानाजी सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजीत आरोग्य शिबीराचे उद्घाटन केल्यानंतर आमदार शहाजी बापू पाटील बोलत होते.

भारत नागणे

Shahajibapu Patil News : शिवसेनेच्या महिला नेत्या शितल म्हात्रे यांच्यावर मुका घ्या मुका अशा शब्दांत शेरेबाजी करणारे संजय राऊत यांच्या वक्तव्याने संपूर्ण महिला वर्गाचा अपमान झाला असून याची किंमत संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे यांना चुकवावी लागेल, असा इशारा आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

आरोग्य मंत्री डाॅ. तानाजी सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजीत आरोग्य शिबीराचे उद्घाटन केल्यानंतर आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) बोलत होते.गेल्या तीन वर्षांपासून संजय राऊत यांचे प्रत्येक विधान पाहिले तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राजकारणातून संपवण्याची कोणाची‌ तरी सुपारी घेतल्या सारखे ते बोलतात असा टोलाही त्यांनी लगावला.

कोणत्याही महिलेला मुका घ्या मुका म्हणणं यातच संजय राऊत यांची संस्कृती दिसते. त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो असे सांगत यांची फळे फक्त संजय राऊत यांनाच नाही तर उद्धव ठाकरे यांना ही भोगावे लागतील असं ही ते म्हणाले.

अंदाज पत्रक इतकं चागलं होत की त्यावर काय बोलावे या धर्मसंकटात अजितदादा अडकले होते. तेवढ्यात उद्धव ठाकरे आले आणि अजित पवार यांनी डोळा मारत आपली सुटका करून घेत उद्धव ठाकरे यांना दानाला दिले. कोणत्या यादीत नाव येवून कोणी नेता होत नसतो त्याला जनतेतून प्रतिसाद लागतो असा टोला आदित्य ठाकरे यांना लगावला.

चाळीस आमदारांना गद्दार म्हणण्यापूर्वी अडीच वर्षांपूर्वी दाऊदला साथ देणाऱ्या काँग्रेस बरोबर सरकार स्थापन करताना आदित्य ठाकरे यांना गद्दारी आठवली नाही का. हिंदू ह्रदय सम्राटांचा विचार फेकून देताना नेमकी गद्दारी कोणी केली यांचं आत्मपरिक्षण आदित्य ठाकरे यांनी करावं असा टोला ही आमदार शहाजी बापू पाटील यांनी लागवला‌.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT