RTMNU  Saam Tv
महाराष्ट्र

नागपुरात पीएचडीच्या विद्यार्थिनींचा लैंगिक छळ; अद्याप कारवाई नाही

यासंदर्भात विद्यार्थिनींनी नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे पत्र लिहीत कारवाईची मागणी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर - पीएचडीच्या (PHD) विद्यार्थिनींने लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. राराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर (Nagpur) विद्यापीठाच्या हिंदी विभागातील प्राध्यापकाने पीएचडी करणाऱ्या दोन विद्यार्थिनींचा लैंगिक आणि आर्थिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आला आहे. यासंदर्भात विद्यार्थिनींनी नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे पत्र लिहीत कारवाईची मागणी केली आहे.

हे देखील पहा -

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागांमध्ये कार्यरत प्राध्यापकाने आपल्यावर लैंगिक आणि आर्थिक छळ केल्याची लिखित तक्रार पीडित युवतीने नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांच्याकडे केली आहे.या दोन विद्यार्थिनींनी विद्यापीठाच्या हिंदी विभागातील संशोधन केंद्रावर पीएचडी साठी आपल्या विषयाचा आराखडा रीतसर सादर केलेला होता, त्यानंतर विद्यापीठाच्या हिंदी विभागातील प्राध्यापकाने त्यांना पैसे आणि शरीर सुखाची मागणी केली.

7 मार्च रोजी रीतसर तक्रार या विद्यार्थिनी कुलगुरू कडे केल्यानंतर अद्यापपर्यंत प्राध्यापकांवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. अखेर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती मीरा खडक्कार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली.

नागपूर विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य विष्णू चांगदे यांनी सिनेटमध्ये हा मुद्दा उपस्थित करत त्यांनी ती तक्रार कुलगुरुंकडे पाठवली होती. मात्र ७ दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा विद्यार्थिनींचा लैंगिक आणि आर्थिक छळ करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई नागपूर विद्यापीठाने केली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी हातात दिसतात 'ही' लक्षणे, वेळीच ओळखलात तर वाचेल जीव

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Maharashtra News Live Update: दिल्लीत भाजप आणि काँग्रेसचं आंदोलन

Breaking News : मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या नेत्यासह दोघांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं काय घडलं?

धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करत संपवलं; नक्की काय घडलं?

SCROLL FOR NEXT