Sextortion: Caution! Making friends with strangers on social media can be expensive; Recovery of ransom from blackmail ...
Sextortion: Caution! Making friends with strangers on social media can be expensive; Recovery of ransom from blackmail ... Saam Tv
महाराष्ट्र

Sextortion: सावधान! सोशल मीडियावर अनोळखी लोकांशी मैत्री करणं पडू शकतं महागात; ब्लॅकमेलिंमधून खंडणीची वसुली...

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक: सोशल मीडियावर अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारत असाल तर सावधान! सोशल मीडियावर सेक्सटोर्शनचा गोरख धंदा सुरु आहे. नग्न व्हिडीओ कॉल आणि ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून खंडणी वसुली होत असून सोशल मीडियावर अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारणं तुम्हाला महागात पडू शकतं. (Sextortion: Caution! Making friends with strangers on social media can be expensive; Recovery of ransom from blackmail ...)

हे देखील पहा -

सोशल मीडियावर मैत्री करून अश्लील व्हिडिओ कॉलद्वारे ब्लॅकमेलिंग करण्याचा गोरखधंदा देशभर सुरु आहे. सामान्य नागरिकांना सॉफ्ट टार्गेट करुन त्यांना ब्लॅकमेल केले जाते आणि पैसे न दिल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. यामुळे समाजातील नाव आणि इभ्रत खराब होऊ नये, या भीतीनं अनेकांनी या टोळ्यांना पैसे दिले आहेत त्यामुळे अनेकांना लाखोंचा गंडा या टोळीनं घातलाय. सोशल मीडियावर सेक्सटोर्शनचा गोरख धंदा करणाऱ्या परप्रांतीय टोळ्या सक्रीय असून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ऑनलाईन उकळली जातेय खंडणी.

- नेमका कसा सुरुय हा ब्लॅकमेलिंगचा गोरख धंदा?

सेक्सटोर्शनचा बळी ठरलेल्या नाशकातील एका पीडित तरुणानं आपली आपबीती साम टीव्हीवर सांगितली. त्याने दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपुर्वी त्याला फेसबुकवर एका महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यानंतर त्या दोघांमध्ये चॅटींग सुरु झालं आणि नंतर एकमेकांचे फोन नंबर घेऊन व्हाट्सएपवर व्हिडिओकॉलवर बोलणं सुरु झालं. काही दिवसांनी महिलेने व्हिडिओ कॉल वर विवस्त्र अवस्थेत महिलेकडून अश्लील भाव करत तरुणाशी झालेलं बोलणं हे फोनमधील स्क्रीन रेकॉर्डरवर व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं. त्यानंतर त्या व्हिडिओचे स्क्रीन शॉट पाठवून तरुणाकडे पैशांची मागणी केली आणि अश्लील शिवीगाळ करत पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली. सोशल मीडियावर एका अनोळखी व्यक्तीशी मैत्री करणं आणि त्यावर अतिविश्वास ठेवणं हे तरुणाला चांगलचं महागात पडलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात फतवा'राज'; महायुतीसाठी राज ठाकरेंचा हिंदूंना फतवा

Kalyan News: कल्याणमध्ये भर रस्त्यावर गावठी कट्ट्यासह फिरत होता सराईत गुन्हेगार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Afghanistan Flooding: अफगाणिस्तानात पुराचा हाहाकार; ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू,१००० घरांचे नुकसान

Special Report | नवनीत राणांचा ओवेसींवर पुन्हा हल्ला!

Raj Thackeray | राज ठाकरेंनी काढला फतवा!

SCROLL FOR NEXT