वेगळा विदर्भ आंदोलन मंगेश मोहिते
महाराष्ट्र

वेगळा विदर्भ आंदोलन; आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

वेगळा विदर्भ झाला पाहिजे या मागणीसाठी विदर्भवादी आंदोलक कालपासून ठिय्या आंदोलन करत असून, आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवादी आंदोलक कालपासून आंदोलन करत आहेत. "वेगळा विदर्भ झाला पाहिजे, विदर्भ आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाच्या" अशा घोषणा देत विदर्भाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी कालपासून आंदोलन सुरु केले आहे.

हे देखील पहा -

नागपूरच्या शहीद चौकातील विदर्भ चंडिकेसमोर, कालपासून विदर्भवाद्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. स्वतंत्र राज्य आणि वीज बिलाच्या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समिती यांनी 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून केंद्र व राज्य सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

शहरात विविध ठिकाणी बॅनर लावून विदर्भाचा झेंडा हातात घेऊन संपूर्ण कार्यकर्ते कालपासून आंदोलनात उतरले आहेत. मात्र, पोलिसांनी आज या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. कारण, आंदोलनकर्त्यांनी सात दिवस आंदोलन करणार असे पत्र पोलीस विभागाला दिले होते. पण पोलिसांनी त्यांना संमती दिली नव्हती. तसेच, कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे कारण देऊन पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरील खर्चात मोठी कपात; सरकारचे किती पैसे वाचणार? समोर आले नवे आकडे

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये मुसळधार पावसाचा फटका; डहाणू–बोर्डी राज्य मार्ग 60 मीटर वाहून गेला, अनेक गावांचा संपर्क तुटला

कारल्यापासून बनवा कुरकुरीत भजी; चहा सोबत लागेल मस्त

Lower Back Pain: दिवसभर बसून काम करता? झोपण्याआधी १० मिनिटं करा 'हा' उपाय; पाठदुखीपासून मिळेल आराम

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा महामार्गावर भीषण अपघातात जागीच मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT