ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांचे निधन  Saam Tv
महाराष्ट्र

ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांचे निधन

समुद्र लेखक म्हणून त्यांची ओळख होती.

श्रेयस सावंत

ज्येष्ठ नाटककार, लेखक,समीक्षक आणि पत्रकार जयंत पवार यांच आज सकाळी निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. मराठी भाषेतील एक विचारी, साक्षेपी आणि संवेदनशील लेखक म्हणून त्यांची ओळख होती. अंधातर नाटक हे नाटक त्यांचा खुप गाजले होतं. समुद्र लेखक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या नाटकातून त्यांनी नेहमी समाजात घेणारे घटनावर त्यांनी भाष्य केलं. त्यांच्या निधनामुळे मराठी नाटक क्षेत्रात शोखकळा पसरली आहे.

जयंत पवार हे एक पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. तेच नाटक नंतर निर्माते संतोष कोचरेकर यांनी कल्पना कोठारी आणि उदय कुलकर्णी यांस सहनिर्माता म्हणून घेऊन आपल्या ‘महाराष्ट्र रंगभूमी’तर्फे व्यावसायिक रंगभूमीवर आणले.

२०१४ सालच्या जानेवारी महिन्यात १० ते १२ या तारखांना महाड येथे झालेल्या १५व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे जयंत पवार हे अध्यक्ष होते. जयंत पवार यांना २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या ’फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी मिळाला.

प्रयोग मालाड' या नाट्यसंस्थेने १३-१४ ऑक्टोबर २०१८ या दिवसांत 'लेखक एक, नाट्यछटा अनेक' या नावाखाली एकांकिका स्पर्धां आयोजित केल्या होत्या. स्पर्धांच्या अंतिम फेरीमध्ये जयंत पवार यांच्या १४ एकांकिकांमध्ये आपआपसात सामना झाला. हा कार्यक्रम मुंबई-बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाचे मिनी थिएटर येथे होता.या स्पर्धांचे हे पाचवे वर्ष होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT