Kaustubh Diwegaonkar Saam TV
महाराष्ट्र

सेमी इंग्रजी ZP शाळेतून हद्दपार; उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

जिल्हा परिषदेच्या 1083 शाळांमध्ये (ZP School) गेल्या नऊ वर्षांपासून सेमी इंग्रजी चा उपक्रम सुरू होता.

साम टिव्ही ब्युरो

कैलास चौधरी

उस्मानाबाद जिल्ह्यात गेली आठ वर्षापासून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीच्या माध्यमातून शिकवण्यात येत होतं. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी हे सेमी इंग्रजी बंद केलं त्यामुळे राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात मोठे घमासान सुरू होते आहे. नक्की काय आहे हा प्रकार वाचा.

जिल्हा परिषदेच्या 1083 शाळांमध्ये (ZP School) गेल्या नऊ वर्षांपासून सेमी इंग्रजी चा उपक्रम सुरू होता. मात्र या विद्यार्थ्यांना काहीच येत नसल्याचे सांगत हा उपक्रम बंद केला आहे, तसा अहवालच डायट या संस्थेने जिल्हाधिकारी यांना दिला त्यामुळे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर (Kaustubh Diwegaonkar) यांनी शाळांमधून सेमी इंग्रजी बंद केले. त्यावरुन त्यांच्या या निर्णयावर चौफेर टीका होत असून यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकण्याचा हक्क हिरावला गेल्याची भावना निर्माण झाली आहे. (Osmanabad News In Marathi: Semi-English Out from ZP School in Osmanabad)

2012 - 13 च्या दरम्यान जिल्ह्यात खासगी इंग्रजी शाळांचे पेव मोठ्या प्रमाणात फुटले होते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी तत्कालीन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे अध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या पुढाकारातून सेमी इंग्रजी (Semi English) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या काही त्रुटी होत्या मात्र दुधगावकरांच्या या निर्णयमुळे खासगी इंग्रजी शाळांकडे विद्यार्थ्यांचा जात असलेला लोंढा थांबला गेला. गेल्या अनेक वर्षांपासून सेमी इंग्रजी सुरू असताना अचानकच हा उपक्रम बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी घेतला आहे.

सेमी इंग्रजी बंद होत असले तरी इंग्रजी भाषा विषय सुरूच राहणार असल्याचेही स्पष्टीकरण या अधिकाऱ्यांकडून देण्यात येते आहे. तसेच इंग्रजी व मराठी भाषा प्रगल्भ होण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे सांगितले जाते आहे. मात्र असे असले तरी हे अधिकारी बदलून गेल्यानंतर पुढे या उपक्रमाचे होणार काय, हा प्रश्न आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

SCROLL FOR NEXT