Nandurbar Crime Saam Tv
महाराष्ट्र

एकतर्फी प्रेमातून धडगाव बस स्थानकात गळफास घेऊन आत्महत्या

धडगाव पोलीस स्टेशन क्षेत्रांतर्गत बाजारपेठेतील बस स्थानक प्रवासी शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार: धडगाव पोलीस स्टेशन क्षेत्रांतर्गत बाजारपेठेतील बस स्थानक प्रवासी शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे रात्री उशिरा नाव व गाव निष्पन्न झाले असून सदर मयत तरुणाचे नाव अर्जुन विरजी पाडवी अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा (Narmada river) काठावरील डनेल सुजवापाडा येथील रहिवासी असल्याची माहिती तपास पोलीस (Police) अंमलदार राजेंद्र जाधव यांनी दिली आहे.

हे देखील पहा-

आत्महत्या करण्यापूर्वी सदर तरूणाने फरशीवर खडूने प्रेम (Love) प्रकरणातून आत्महत्या करत असल्याच्या आशयाची नोट लिहिली होती. मात्र, त्याच्या परिवाराने (family) दिलेली माहिती चक्क करणारी आहे. अर्जुन विवाहित असून त्याची पत्नी आणि ३ मुले असल्याची माहिती अर्जुनच्या परिवाराने दिली आहे. अर्जुनने लिहिलेल्या नोटमध्ये वैशाली नामक मुलीचा उल्लेख केला होता. मात्र, अर्जुनच्या परिवाराला या मुली बद्दल काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

रात्री उशिरा अर्जुनचे वडील काका व गावचे सरपंच आणि नातेवाईकांना अर्जुनचा मृतदेह ताब्यात देण्यात आला आहे. गळफास घेतलेल्या ठिकाणी वैशाली नावाच्या मुलीला उद्देशून प्रेम संबंधी मजकूर अर्जुनने एकतर्फी प्रेमातून लिहून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत धडगाव पोलीस स्टेशनात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून अधिक तपास धडगाव पोलीस स्टेशन करीत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT