Pandharpur News Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur News: विठ्ठल मंदिरातील सुरक्षा रक्षकाची मुजोरी; विठोबाच्या पायावरचं आपटलं भाविक महिलेचे तोंड

Vitthal Temple : विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील सुरक्षा रक्षकाची मुजोरी पुन्हा एकदा समोर आलीय.

Bharat Jadhav

Pandharpur Vitthal Rukmini Temple :

पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील सुरक्षा रक्षकाची मुजोरी पुन्हा एकदा समोर आलीय. विठोबाचे दर्शन घेत असताना भाविक महिलेचं तोंड विठ्ठलाच्या पायावरच आपटलं. यामुळे भाविक महिलेचं ओठ फुटलं असून त्या रक्तबंबाळ झाल्या आहेत. (Latest News

महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनाला राज्यभरातील भाविक पंढरपूरला येत असतात. आपल्या लाडक्या विठोबाच्या दर्शनासाठी तासन् तास रांगेत उभे राहतात. जेणेकरून देवचं मनसोक्त दर्शन करता येईल. परंतु मंदिरातील सुरक्षा रक्षक मात्र भाविकांना देवाच्या दरबारी क्षणभर देखील उभे राहू देत नाहीत.

(सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा)

दर्शनाला आलेल्या भाविकांना पुढे-पुढे ढकलंत असतात. यामुळे बहुतेकवेळा भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद होत असतात. अनेकदा भाविकांना ढकलत वृद्ध आणि महिला भाविकांचा तोल जाणून त्या खाली पडून त्यांना दुखापत होत असते. मात्र सुरक्षा रक्षकांना त्याची फिकरी पडलेली नसते.

असाच अनुभव बीडमधील विठ्ठल भक्त महानंदा गयबी आणि त्यांचे पती दिलीप गयबी आला. हे दाम्पत्य विठोबाच्या दर्शनासाठी बीडमधील किल्ले धारूर येथून पंढपूर येथे आले. दुपारी एक वाजता दर्शन रांगेत उभे राहिले होते. तब्बल सहा तासानंतर गयबी दाम्पत्याला विठुरायाचं दर्शन घेण्याची संधी मिळाली. विठोबाचे चरण स्पर्श करत होते. त्यावेळी सुरक्षा रक्षकाने महानंद यांचे डोकं विठुरायाच्या चरणावर आपटलं.

यामुळे महानंद यांचे ओठ पायावर आपटल्या गेले यात त्या जखमी झाल्या आहेत. महानंद याचे ओठ फुटले असून त्या रक्तबंबाळ झाल्या आहेत. भाविकांसोबत अशा धसमुळेपणाने वागणाऱ्या महिला सुरक्षा रक्षकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गयबी दाम्पत्याने केली आहे.

काही दिवसांपूर्वी ही सुरक्षा रक्षकांकडून भाविकांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. महिला भाविकांना देखील धक्काबुक्की करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यातील विठ्ठल भाविकांना सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अंबाबाईच्या दर्शनाला

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

SCROLL FOR NEXT