Charanraj Chavare
Charanraj ChavareSaam TV

Political News : शिवसेना शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर, पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुखांना हटवण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी

Shivsena Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उपनेते भरत गोगावले यांच्याकडे चरणराज चवरे यांना हटवण्याची मागणी केली आहे.
Published on

Pandharpur News :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख चरणराज चवरे यांची हकालपट्टीची मागणी जोर धरु लागली आहे. शिवसेना शिंदे गटाच्याच पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली आहे.

पंढरपूर विभागातील तालुका अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उपनेते भरत गोगावले यांच्याकडे चरणराज चवरे यांना हटवण्याची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

Charanraj Chavare
Santosh Bangar News: शेतकऱ्यांचा तळतळाट घेऊ नका; पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर आमदार बांगर भडकले

पंढरपूर विभागाच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून मागील काही दिवसांपासून दोन गटात वाद सुरू आहे. त्यातून चवरे यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. जिल्हाप्रमुख चरणराज चवरे हे पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता काम करतात, असा आरोप त्यांच्यावर आहे. (Political News)

Charanraj Chavare
NCP Political News : बारामतीत सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार आव्हान देणार? वारजे भागातील बॅनरमुळे पुन्हा राजकीय चर्चांना उधाण

पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ येथील तालुका प्रमुखांनी चरण चवरे यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. त्यांमुळे या अंगर्गत वादाचा फटका शिंदे गटाला बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com