Nashik : नाशिकमध्ये कलम 144 लागू ; जलतरण तलाव, ब्युटी पार्लर, स्पा सेंटरही राहणार बंद  Saam TV
महाराष्ट्र

Nashik : नाशिकमध्ये कलम 144 लागू ; जलतरण तलाव, ब्युटी पार्लर, स्पा सेंटरही राहणार बंद

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येवरती कोरोना निर्बंध लावले जात आहेत.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : नाशिक शहरात कलम 144 लागू करण्यात आली आहे. तसंच दिवसा जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येवरती कोरोना निर्बंध लावले जात आहेत. त्यामुळे नाशिक (Nashik) शहरामध्ये कोरोनाच्या (Corona) वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी नवे सुधारित आदेश दिले आहेत.

या सुधारित आदेशानुसार जलतरण तलाव, ब्युटी पार्लर (Beauty parlor) स्पा सेंटर, वेलनेस सेंटर पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार असून शहरातील सर्व उद्यानं, किल्ले, प्राणी संग्रहालयं आणि पर्यटन स्थळंदेखील पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान खासगी कार्यालयात 50 टक्के उपस्थिती अनिवार्य असून कामाचे विभाजन 24 तासात करण्याचा उल्लेख य़ा सुधारीत आदेशामध्ये केला आहे. खासगी कार्यालयं 24 तास उघडे ठेवण्याची परवानगी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी चोरी; १२ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने लंपास|VIDEO

राज ठाकरे यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी; मनसे कार्यकर्त्यांना रीलस्टारला काळे फासून माफी मागायला लावली

Amazon Sale: शॉपिंगसाठी तयार राहा! ॲमेझॉनच्या सर्वात मोठ्या सेलच्या तारखेची घोषणा, जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर

गणपती मिरवणुकीत भाजप अन् ठाकरे गटात मोठा गोंधळ; ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT