आदिवासी भागातील शाळा चक्क एका दिवसात गेली चोरीला ! संजय जाधव
महाराष्ट्र

आदिवासी भागातील शाळा चक्क एका दिवसात गेली चोरीला !

बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड या गावातील शाळा चक्क चोरीला गेली की तिला पाय फुटून कुठे निघून गेली असा सवाल या गावातील प्राथमिक शाळेतील मुलांना व गावातील नागरिकांना पडला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय जाधव

बुलढाणा: बुलढाणा Buldhana जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड Borkhed या गावातील शाळा School चक्क चोरीला गेली की तिला पाय फुटून कुठे निघून गेली असा सवाल या गावातील प्राथमिक शाळेतील मुलांना व गावातील नागरिकांना पडला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी अचानक गायब झालेल्या शाळेला शोधून काढण्यासाठी शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. Schools in tribal areas were demolished in one day

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड गाव आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाते. गावात फक्त तीन खोल्या असणारी जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवी पर्यंत दोन शिक्षक असलेली शाळा गेल्या १७ जून २०२१ पर्यंत अस्तित्वात होती. पण अचानक १८ जून रोजी शाळा गायब झाल्याने नागरिकांना आश्चर्य चा धक्का बसला आहे. काल- परवा पर्यंत शाळेच्या परिसरात खेळण्याऱ्या मुलांनाही शाळा गायब झाल्याने धक्का बसला. यासाठी गावातील नागरिकांनी चौकशीला सुरुवात केली.

हे देखील पहा-

बोरखेड या गावात वर्ग एक ते वर्ग पाच अशी दोन वर्ग खोल्यांची शाळा होती. गावातील सरपंच , ग्रामसेवक व शाळेचा मुख्याध्यापक यांनी संगनमताने ही शाळा इमारत धोकादायक असल्याचं दाखवून चक्क एका रात्रीतून जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. तसेच शाळेतील अनेक साहित्य लंपास केल्याचा आरोप गावकऱयांनी केला आहे. यासाठी कुठलीही प्रशासकीय परवानगी मुख्याध्यापक किंवा सरपंचाने घेतली नसल्याचंही गावकऱ्यांनी समोर आणले आहे.

त्यामुळे या गावातील मुलांनी आता शिक्षण कुठे घ्यायच किंवा शिकायचं कि नाही हा प्रश्न गावकाऱ्यांना पडला आहे. यासंबंधी गावातील नागरिकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारही केली आहे. ही शाळा इमारत धोकादायक दाखवून ,खोटा अहवाल पाठवून कुठलीही प्रशासकीय मान्यता न घेता मुख्याध्यापक, सरपंच व ग्रामसेवक यांनी आपला आर्थिक लाभ करून घेण्यासाठी चक्क गावातील शाळाच भुईसपाट केल्याचा आरोप गावकऱ्यांनी तक्रारीत केला आहे.

तर दुसरीकडे ही शाळा दि. १० जून रोजी झालेल्या वादळात व पावसामुळे पडल्याचा अहवाल खुद्द या शाळेच्या मुख्याध्यापकांनी वरिष्ठांना लेखी स्वरूपात केला आहे. या बाबतीत या शाळेचे मुख्याध्यापक यांना शाळेबद्दल व शाळा कशी भुईसपाट झाली याबद्दल विचारणा केली असता, " मला या शाळेबाबतीत काहीही माहिती नाही. शाळा कशी पडली किंवा कुणी पाडली याबद्दल मला काहीही माहिती नसल्याचे या शाळेवरील अधिकृत मुख्याध्यापक यांनी अशी माहिती दिली आहे.

याबाबतीत जिल्हा शिक्षण अधिकारयांना विचारणा केली असता, ही शाळा गायब झाल्या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून ,शाळा मुख्याध्यापक यांना पोलिसात Police तक्रार नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्याचं जिल्हा शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Motivation : सकाळी स्वत:ला या ५ सवयी लावा, आयुष्यात खुप पुढे जाल

Donald Trump: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पविरोधात मोठं आंदोलन, 70 लाख आंदोलक रस्त्यावर , नेमकं कारण काय?

Liver disease warning: लिव्हर खराब झाल्यावर त्वचेवर दिसतात 'हे' बदल; गंभीर गुंतागुंत होण्यापूर्वी लक्ष द्या

Manoj Jarange Effect : जालना पोलिस पाटील भरतीत ‘जरांगे इफेक्ट’! मराठा समाजाच्या उमेदवारांचा डंका

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

SCROLL FOR NEXT