Schools closed in State Tomorrow due to Heavy Rain Saam TV
महाराष्ट्र

Schools closed in State Tomorrow due to Heavy Rain : राज्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर, अतिवृष्टीमुळे सरकारची घोषणा

Rain Alert in State : राज्यातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करणेबाबतचे परीपत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.

साम टिव्ही ब्युरो

रुपाली बडवे

Maharashtra Rain Update : राज्यातील अनेक भागात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती आहे. सतत कोसळत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता राज्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करणेबाबतचे परीपत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली व त्यांच्या आदेशानुसार शालेय शिक्षण विभागाने आपल्या विभागाचे परीपत्रक तात्काळ जाहीर केले.

शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अनुषंगाने राज्यातील आपत्कालीन परिस्थितीत आपल्या कार्यकक्षेतील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. (Latest marathi News)

हवामान खात्याच्या अंदाजावरून तसेच त्या-त्या भागातील पावसाच्या सद्यस्थितीचा व त्या अनुषंगाने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्या कार्यकक्षेतील/स्थानिक क्षेत्रातील शाळांना सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने सुट्टी जाहीर करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.

विभागीय शिक्षण उपसंचालकांचे निर्देश

तसेच भविष्यातही अशी परिस्थिती उद्भवल्यास त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असे परीपत्रक विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई संदीप संगवे यांनी काढले आहे. शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकामुळे मुख्याध्यापक व संस्थाचालकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FDAची मोठी कारवाई; ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात १० टन पनीर, खवा जप्त

Weather Update: उन्हाच्या तडाख्यात 9 राज्यात पाऊस घालणार धुमाकूळ, कोणत्या राज्यांसाठी हवामान विभागानं दिला अलर्ट?

Gokul Election: निकाल जाहीर होताच महायुतीला दाखवला कोल्हापुरी हिसका; मुश्रीफ,नरकेंचं नाव घेत सतेज पाटील काय म्हणाले?

साठीच्या शिवसेनेला GEN Zचा चेहरा, आदित्य ठाकरे शिवसेनेचे नवे कार्याध्यक्ष?

Gokul Election: सतेज पाटलांचा नादखुळा; महायुतीच्या चार पहेलवानांना घोबीपछाड

SCROLL FOR NEXT