Accident  Saam TV
महाराष्ट्र

CCTV Footage : शिक्षक दिनाच्या एक दिवस आधी शिक्षिकेचा अपघाती मृत्यू, कुटुंबीय आणि विद्यार्थ्यांवर शोककळा

Teacher Dies in Accident : अनिता किशोर ठाकरे (48 वर्ष) असं मृत शिक्षिकेचं नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय तुमराम

Chandrapur News :

देशभरात उद्या ५ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा होणार आहे. मात्र शिक्षण दिनाच्या पूर्वसंध्येला चंद्रपुरातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. चंद्रपुरातील एक शिक्षिकेचा अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात देखील कैद झाली आहे. (Maharashtra News)

अनिता किशोर ठाकरे (48 वर्ष) असं मृत शिक्षिकेचं नाव आहे. त्या चंद्रपूर शहरातील श्रीकृपा कॉलनी येथे वास्तव्याला होत्या. त्या जिल्हा परिषद शाळा लखमापूर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. (Breaking Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी त्या शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या. चंद्रपूर-नागपूर मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपजवळ अचानक भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने ठाकरे यांच्या दुचाकी वाहनाला धडक दिली.

या धडकेत शिक्षिका ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यावर ट्रक चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्नाचा हट्ट धरला, वाद टोकाला गेला; सनकी बॉयफ्रेंडनं अल्पवयीन गर्लफ्रेंडला निर्घृणपणे संपवलं, मुंबई हादरली

मुंबईत भीषण अपघात, बेस्ट बसने १४ वाहनांना धडाधड उडवले; थरार CCTV मध्ये कैद

Maharashtra News Live Update: मालेगावजवळ कॅटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात,एक ठार

बेड उघडला तर नोटा आणि भिंत तोडली तर सोन्याचा खजिना! माजी ARTO अधिकाऱ्यांच्या घरात कुबेराचा खजिना

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT