Aurangabad School Train Video माधव सावरगावे
महाराष्ट्र

Video: विद्यार्थ्यांसाठी कायपण! संपूर्ण शाळाच बनवली ट्रेन; आगळ्या-वेगळ्या शाळेत विद्यार्थी जातात आनंदात

Aurangabad Latest News: शाळाचे इमारत जर आकर्षित असेल, मोकळी आणि हवेशीर असेल तर विद्यार्थीही शाळेत जायला कंटाळा करत नाही.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: विद्यार्थ्यांना शाळेकडे (School) आकर्षित करण्यासाठी त्यांना अभ्यासाची गोडी लावण्यासाठी शिक्षक अनेक प्रयत्न करत असतात. तसं पालकही विद्यार्थ्यांनी शाळेत जावं यासाठी धडपड करत असतात. पण, त्या बालवयात काही विद्यार्थ्यांना शाळा कंटाळवाणी वाटते. याची अनेक कारणं असू शकतात, पण यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे शाळेची इमारत. (Aurangabad Latest News)

शाळाचे इमारत जर आकर्षित असेल, मोकळी आणि हवेशीर असेल तर विद्यार्थीही शाळेत जायला कंटाळा करत नाही. हीच बाब लक्षात घेऊन एका शाळेनं आपल्या इमारतीचा कायपालट केला आहे. विद्यार्थ्यांनी आनंदाने आणि दररोज शाळेत यावं यासाठी एका शाळेनं आपल्या इमारतील चक्क रेल्वे ट्रेनचा लूक दिला आहे. या शाळेच्या इमारतीला कलात्मकरीत्या रंग देऊन ती एखादी ट्रेन असल्यासारखीच भासते. तुम्ही या शाळेचे व्हिडीओ पाहून संभ्रमात पडाल. कारण रेल्वे पटरीवरून रेल्वे रस्त्यावर आली कशी असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. पण ही रेल्वे नाही तर ती एका शाळेची इमारत आहे. (Maharashtra News)

पाहा व्हिडिओ -

औरंगाबाद जिल्ह्यातील जळगाव महामार्गावर चक्क ही रेल्वेवजा शाळा अवतरली आहे. केऱ्हाला फाट्यानजीकच्या रोडलगत असलेल्या या खासगी शाळेतील शिक्षकांनी वेगळेपण जपत मुलांना आकर्षित करण्यासाठी शाळेला असा रंग दिला आहे. टिनपत्र्यांपासून उभारलेली ही शाळेची इमारत पाहून पालक, विद्यार्थ्यांना रेल्वे पाहत असल्याचा अनुभव येतो. मुलेही ही आगळीवेगळी शाळा पाहून आनंदी होतात आणि उत्साहात शाळेत येतात.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT