Schools Reopen In Raigad राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

Schools Reopen: रायगडात शाळेची घंटा वाजली! आजपासून ऑफलाईन वर्ग सुरू...

Schools Reopen In Raigad: रायगडचे जिल्‍हाधिकारी डॉ. महेंद्र कल्‍याणकर यांनी आदेश जारी केले होते. मात्र पनवेल महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू होणार नाहीत.

साम टिव्ही

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड: जिल्‍हयात आज सोमवार 31 जानेवारीपासून पुन्हा शाळेची घंटा (Schools Reopening In Raigad) वाजली आहे. 28 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या झालेल्या टास्क फोर्स (Task Force) बैठकीत शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार जिल्‍हयातील पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे रायगडचे (Raigad) जिल्‍हाधिकारी डॉ. महेंद्र कल्‍याणकर (Dr. Mahendra Kalyankar) यांनी आदेश जारी केले होते. मात्र पनवेल महापालिका (Panvel Municipal Corporation) क्षेत्रातील शाळा सुरू होणार नाहीत. (School bell rings in Raigad! Offline classes starting today ...)

हे देखील पहा -

कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाल्‍यानंतर राज्‍यातील शाळा सुरू (Schools Reopen) करण्‍याचा निर्णय राज्‍य सरकाने घेतला. त्‍यानुसार अनेक भागातील शाळा 24 जानेवारीपासून सुरू देखील झाल्‍या. मात्र रायगड जिल्‍हयातील शाळा सुरू झाल्‍या नव्हत्या. यामुळे विद्यार्थ्‍यांबरोबरच पालकवर्गातही उत्‍सुकता होती. रायगड जिल्‍हास्‍तरीय टास्‍क फोर्सची बैठक 28 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत झालेल्‍या चर्चेअंती 31 जानेवारीपासून शाळा सुरू करण्‍यास टास्‍कफोर्सने हिरवा कंदील दाखवला. त्‍यानंतर जिल्‍हाधिकारी यांनी जिल्‍हयातील शाळा सुरू करण्‍याचे निर्देश जारी केले आहे.

आजपासून शाळा महाविद्यालय सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. कोरोनामुळे शाळा बंद चालू राहत असल्याने मुलाच्या शिक्षणात अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण गेली दोन वर्षापासून सुरू आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ऑफलाईन वर्ग सुरू होत आहेत. आज सोमवार 31 जानेवारी पासून पुन्हा शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्गातही आनंद पसरला आहे. शाळेत विद्यार्थ्यांची तापमान तपासणी करून कोरोना नियमांचे पालन करून पुन्हा शाळेत किलबिलाट सुरू झाला आहे.

जिल्‍हाभरातील शाळा सुरू होणार असल्‍या तरी पनवेल महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्‍यास जिल्‍हा प्रशासनाने अनुमती दिलेली नाही. पनवेल परिसरात अद्याप कोरोना रूग्‍णांची संख्‍या मोठी असून त्‍यात नव्‍याने भर पडते आहे. आजच्‍या घडीला पनवेलमध्‍ये 4 हजार 10 रूग्‍ण उपचार घेत आहेत. दररोज 200 हून अधिक नवीन रूग्‍णांची नोंद होत आहे. ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात येऊ लागला आहे.

केंद्र सरकारच्‍या निर्देशानुसार 15 ते 18 वयोगटातील मुलांच्‍या लसीकरणाला 3 जानेवारीपासून सुरूवात झाली. रायगड जिल्‍हयात आतापर्यंत 76 हजार 96 मुलामुलींनी करोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला आहे. दरम्‍यान शाळा सुरू करण्‍यापूर्वी शाळेत कोविड प्रतिबंधात्‍मक सर्व उपाययोजना करून घ्‍याव्‍यात, तसेच 15 ते 18 वयोगटातील मुलामुलींचे लसीकरण करून घ्‍यावे, अशा सूचना जिल्‍हाधिकारी यांनी दिल्‍या आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT