eknath shinde, deepak kesarkar, sindhudurg, shivsena, maharashtra politics crisis. saam tv
महाराष्ट्र

शिवसेना अंगार है...बाकी सब भंगार है! संतप्त शिवसैनिक आजही उतरले रस्त्यावर

आज (साेमवार) सावंतवाडीत शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे रॅली काढून दर्शविले.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : नगरविकास मंत्री तसेच शिवसेनेचे (shivsena) बंडखाेर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या गटात माजी गृहराज्यमंत्री आमदार दिपक केसरकर (deepak kesarkar) हे शिंदे गटात नुकतेच सहभागी झाले आहेत. केसरकर यांच्या या भुमिकेचे आज (साेमवार) सावंतवाडीत शिवसैनिकांनी (shivsainik) निषेध नाेंदविला. दरम्यान आम्ही मुख्यमंत्री उद्धव (uddhav thackeray) ठाकरे यांच्या बाजूने पाठीशी ठाम असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले. (deepak kesarkar latest marathi news)

शिवसैनिकांनी सावंतवाडीत (Sawantwadi) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आगे बढाे हम तुम्हारे साथ है... शिवसेना अंगार है...बाकी सब भंगार है... अशी घाेषणा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रॅली काढली. या (eknath shinde latest news) रॅलीत मोठया संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. शिवसैनिकांनी हातात भगवे झेंडे फडकावून चाैका चाैकात घाेषणाबाजी केली.

ही रॅली दीपक केसरकर यांच्या घरासमोर येताच शिवसैनिकांचा जोर चढल्याचे दिसून आले. शिवसैनिकांनी केसरकरांच्या घरासमोर मोठया मोठयाने हाताने टाळ्या बडवत शिवसेना अंगार है...बाकी सब भंगार है अशा घाेषणा दिल्या. ही रॅली पुढे पुढे सरकत असताना शिवसैनिक जनतेस सेनेच्या पाठीशी राहण्याचे आवाहन करीत हाेते. या रॅलीत जिल्हाप्रमुख संजय पडते, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, संदेश पारकर व जिल्ह्यातील नेते ,पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केसरकर यांच्या घराबाहेर पोलीसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

SCROLL FOR NEXT