मुंबईतील सावली बारनं राज्याच्या राजकारणात वादाचा बार उडवलाय. याच वादामुळे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या या बारमधील ऑर्केस्ट्राची मान्यता रद्द करण्यात आलीय... तर अडचणीत आलेल्या कदमांनी बार चालकासोबतचा करारनामाही रद्द केलाय
नियमभंग झाल्यानं सावली बारची मान्यता पोलिसांकडून रद्द
बारमध्ये जेवण आणि मद्य सेवनावर 2 महिने बंदी
बारचा गुमास्ता, अन्न औषध परवाना, मद्य परवाना रद्द होण्याची शक्यता
दरम्यान सावली बारवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय आणि थेट कदमांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.
विरोधक जरी राजीनाम्याच्या मुद्दयावर ठाम असले तरी मुख्यमंत्र्यांनी मात्र यापुढे मंत्रिमंडळात फेरबदल होणार नाहीत असं सांगत एकप्रकारे कदमांना अभय दिलं आहे.
दुसरीकडे अंजली दमानियांनी योगेश कदमांविरोधात थेट न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय..
गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील आमदार आणि मंत्री वेगवेगळ्या कारनाम्यामुळे वादाचा भोवऱ्यात अडकलेत.मात्र मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर मंत्रिमंडळातील खातेबदलाची शक्यता आता धूसर होतेय. मात्र मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे अडचणीत वाढत असताना डॅमेज कंट्रोल करणं महायुतीला जड जाणार, हे मात्र निश्चित....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.