Beed Crime Satish Bhosale Saam Tv
महाराष्ट्र

Satish Bhosale: सतीश भोसलेच्या अडचणीत वाढ, २४ तासांत दुसरा गुन्हा; ढाकणे कुटुंब दहशतीखाली

Beed Crime News: बीडमध्ये गरीब व्यक्तीला विवस्त्र करून मारहाण करणारा सतीश भोसलेविरोधात पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्याच्याविरोधात २४ तासांत दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणा ताजे असतानाच बीडमध्ये गरीब व्यक्तीला अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गरीब व्यक्तीला विवस्त्र करून मारहाण करणारा सतीश भोसलेविरोधात पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्याच्याविरोधात २४ तासांत दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या ढाकणे कुटुंबाला सतीश भोसलेने मारहाण केली होती ते कुटुंब सध्या दहशतीखाली असून त्यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे.

बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी येथील ढाकणे पिता पुत्राला सतीश भोसले आणि त्याच्या इतर साथीदारांनी मारहाण केल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी घडली होती. या प्रकरणात आता शिरूर पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सतीश भोसले आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केल्याने ढाकणे कुटुंब प्रचंड दहशतीखाली असून आम्हाला पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

तर दुसरीकडे सतीश भोसले याच्या आकावर कारवाई करावी अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान या दोन्ही गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिस सतीश भोसलेच्या शोधात आहेत. अद्याप त्याला अटक करण्यात आली नाही त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सतीश भोसलेला बेड्या कधी ठोकणार असा सवाल बीडचे नागरिक करत आहेत.

दरम्यान, सतीश भोसले हा भाजपचा कार्यकर्ता असून तो आमदार सुरेश घस यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. पण या प्रकरणात सतीश भोसले दोषी असेल तर त्याच्याविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. पोलिसांनी सतीश भोसलेची कुंडली शोधून काढली आहे. त्याने २०० काळवीट, शेकडो हरणं, ससे आणि मोरांचा सतीश भोसलेने जीव घेतला असल्याचे समोर आले आहे. आष्टी, शिरूर आणि पाटोद्यामध्ये सतीश भोसलेची ओळख खोक्या पार्टी गोल्डमॅन अशी आहे. त्याने आतापर्यंत अनेक गुन्हे केल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT