Satish Bhosale New Video Saam Tv
महाराष्ट्र

Satish Bhosale: सतीश भोसलेचा आणखी एक प्रताप, कारमध्ये फेकले नोटांचे बंडल, पाहा VIDEO

Satish Bhosale New Video: गरीबाला मारहाण करणाऱ्या सतीश भोसलेचा आता आणखी एक प्रताप उघड झाला आहे. त्याचा कारमध्ये पैशांचे बंडल फेकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या आधी त्याचा एका व्यक्तीला मारहाण करताचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Priya More

संजय गडदे, मुंबई

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यांच्या हत्येला तीन महिने उलटले तरी देखील देशमुख कुटुंबीयांना अद्याप न्याय मिळाला नाही. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीडमध्ये गुन्हेगारीच्या एकापाठोपाठ एक घटना समोर येत आहेत. बीडमधील दहशत संपण्याचे नाव घेत नाही.

अशामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांचा समर्थकाने एका गरीब व्यक्तीला बॅटच्या सहाय्याने अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सतीश भोसले असे या व्यक्तीचे नाव असून तो भाजपचा कार्यकर्ता आहे. सतीश भोसलेचा आता आणखी एक प्रताप उघड झाला आहे. त्याचा कारमध्ये पैशांचे बंडल फेकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सतीश भोसलेने एका व्यक्तीला अमानुष मारहाण करत बॅटने त्याचे दात पाडल्याचा एक व्हिडिओ सोशल माध्यमातून चांगलाच वायरल झाला आहे. मात्र हा व्हिडिओ दोन ते अडीच वर्षे जुना असल्याचा दावा बीडचे एसपी नवनीत कामत यांच्याकडून करण्यात आला असून त्यावर आता सुमोटो ॲक्शन घेणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणांमध्ये स्वतः पोलिस फिर्यादी होऊन सुमोटोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसलेचा एका व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता सतीश भोसलेचा दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये सतीश भोसलेचा नवा प्रताप दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सतीश भोसले हा कारमध्ये ५०० च्या नोटांचे बंडल फेकताना दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत हा कार्यकर्ता कोण? आणि याच्याकडे एवढे पैसे कुठून आले? याची चौकशी करा आणि अटक करा असे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT