satej patil
satej patil 
महाराष्ट्र

या शहारांत आयटी हब विकसित करण्याचं आमचे लक्ष्य : सतेज पाटील

Siddharth Latkar

सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने श्रेणी 2 आणि श्रेणी 3 शहरांपर्यंत आयटी हब IT HUB विस्तारण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. यामुळे पुणे आणि मुंबईवरील भार कमी हाेईल असे मत माहिती तंत्रज्ञान आणि गृह राज्यमंत्री सतेज पाटील satej patil यांनी व्यक्त केले. इंडियन मर्चंट चेंबर IMC ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीद्वारे आयोजित ‘एंगेज महाराष्ट्र, रीबूट, रिफॉर्म, रिसर्ज’राउंड टेबल कॉन्फरन्समध्ये Engage Maharashtra, Reboot, Reform, Resurge’ round table conference ते बोलत होते.

आयटी क्षेत्रात मुंबई mumbai आणि पुणे pune ही दाेन महानगरं केवळ राज्यातच नव्हे तर देशात आघाडीवर आहेत. या भागात महाराष्ट्र आणि देशातील लाखो लोकांना राेजगाराची अपेक्षा असल्याने आंतरराज्य आणि शहरांतर्गत स्थलांतर वाढू लागले आहे. त्यामुळे या दाेन महानगरांव्यतरिक्त आयटी क्षेत्र विस्तारण्याचे सरकारचे धाेरण असल्याचे मंत्रि पाटील यांनी नमूद केले.

या आॅनलाईन कॉन्फरन्समध्ये राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्रि सतेज पाटील यांनी सरकाराचे आयटी विषयीचे धाेरण आणि आत्तापर्यंत राबविलेले उपक्रम याची माहिती दिली. ते म्हणले आगामी काळात सातारा, अमरावती, लातूर, नांदेड, नागपूर आणि इतर श्रेणी 2 आणि 3 शहरांपर्यंत आयटी क्षेत्र विस्तारण्यासाठी तिथल्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा आमचा मानस आहे. एका वेगळ्या आयटी धोरणाद्वारे उद्योगांना वीज आणि इतर विविध सुविधांसह मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहाेत. सुलभ प्रक्रियेच्या माध्यमातून या शहरांमध्ये आयटीला प्राेत्साहन देण्यासाठी एक मॉडेल तयार करीत आहाेत असेही श्री पाटील यांनी नमूद केले.

एक प्रगतिशील राज्य म्हणून, महाराष्ट्र आयटी क्षेत्रात आघाडीवर आहे आणि महाविकास आघाडी सरकार या क्षेत्रासाठी १०० टक्के सहकार्य देत आहे. आगामी काळात राज्यात या क्षेत्राच्या विकासासाठी अधिकाधिक प्रोत्साहन देण्याची खात्री मंत्रि पाटील यांनी दिली.

मुंबई, पुणे, औरंगाबाद ही महानगरं आयटी हब सिद्ध झाली आहेत. या शहरांमधील उपलब्ध मनुष्यबळाने आयटी क्षेत्रात राज्याला अव्वल स्थानी नेऊन ठेवले आहे. महाविकास आघाडी सरकारने 'महाआयटी'च्या माध्यमातून अनेक प्रमुख प्रकल्प हाती घेतले आणि अंमलात आणले आहेत. गत वर्षी 30 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी वितरित करण्यासारखा उपक्रम राबविला तसेच आजही विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीचा लाभ देत आहाेत असे पाटील यांनी नमूद केले.

ते म्हणाले आयटीचा आणखी एक मोठा अनुप्रयोग राज्य सरकारद्वारे लवकरच सुरू होणाऱ्या हेल्थकेअर प्लॅटफॉर्मच्या रूपात येत आहे. जे राज्यातील ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्य केंद्रांना (PHCs), नागरी रुग्णालये आणि शहरी भागातील वैद्यकीय महाविद्यालयांशी जोडेल.एका क्लिकवर आरोग्यसेवेच्या गरजा पूर्ण हाेतील असा दावा मंत्रि पाटील यांनी केला.

जिल्हा रुग्णालये आणि दवाखान्यांशी आम्ही जिल्हा प्रशासनाला जोडणार आहाेत. जेणेकरून नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या काही क्षणात सुटतील. आतापर्यंत राज्यातील 25 जिल्हे आणि शहरांमधील 12,000 ग्रामपंचायतींना 'महानेट' आणि 'भारतनेट' या माध्यमातून ऑप्टिकल फायबर-सक्षम इंटरनेटने जोडले आहे.

महाराष्ट्र सरकार नेहमीच उद्याेग, व्यवसायिकांच्या सूचनांचा विचार करुन ठाेस पावले उचलत असते. आयटी उद्योगांच्या शिफारशींचा नेहमीच विचार केला जाताे. हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्क आणि हडपसरमधील सायबरसिटी मगरपट्टा याशिवाय, पुण्यात अनेक प्रमुख आयटी हब आहेत. नवी मुंबई आणि ठाण्यासह मुंबई आणि आसपासच्या मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) 25 हून अधिक प्रमुख केंद्र आहेत असेही त्यांनी नमूद केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chakan Gas Tanker Explosion: पुण्यात गॅस टँकरचा स्फोट कसा झाला?, समोर आली धक्कादायक माहिती

Today's Marathi News Live: मान्सून आज अंदमानात दाखल होणार, महाराष्ट्रात तुफान पाऊस कोसळणार

Milk Powder : दूध नसल्यास तुम्हीसुद्धा मिल्कपावडरचा जास्त वापर करता? वाचा आरोग्यावर होणारा परिणाम

Pune Metro News: पुणेकरांसांठी गुडन्यूज! फक्त १०० रुपयांचा पास अन् मेट्रोने करा दिवसभर प्रवास; काय आहे नवी योजना?

Petrol Diesel Price: मुंबईसह पुण्यातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा आजच्या किंमती

SCROLL FOR NEXT