Satej Patil, Mahadevrao Mahadik, Kolhapur News saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : बहुमताच्या जोरावर राजाराम सहकारी साखर कारखाना तुमच्या नावावर करुन टाका; सतेज पाटलांचा महादेवराव महाडिकांना टाेला

rajaram sahakari sakhar karkhana latest marathi news : आगामी काळात राजाराम सहकारी कारखान्याची वार्षिक सभा हाेणार आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : कोल्हापुरातील राजाराम सहकारी साखर कारखाना बहुमताच्या जोरावर खाजगी साखर कारखाना करा आणि तो तुमच्याच नावावर करा अशी टीका काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर केली आहे. आमदार पाटील यांनी काेल्हापूरात माध्यमांशी संवाद साधताना राजारामच्या सभेविषयी देखील भाष्य केले. (Maharashtra News)

सतेज पाटील म्हणाले राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र हे 6 तालुक्यांमध्ये पसरले आहे. साखर कारखान्याच्या होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची वेळ ही दुपारी एक वाजताची ठेवावी अशी सभासदांनी मागणी केलेली आहे.

सतेज पाटील (satej patil) म्हणाले कारखान्याच्या पोटनियमांमध्ये अनेक बदल केलेले आहेत. ज्या पोट नियमानुसार 1200 सभासद कमी झालेले आहेत, तोच पोटनियम पुन्हा येऊ लागलेला आहे. भाड्याने जमीन घेतली तरी या कारखान्याचा सभासद होता येतं अशी पद्धत या कारखान्यात सुरू झालेली आहे.

त्यामुळे हा कारखाना आता सहकार ऐवजी खाजगी कारखाना करा असं अशी टीका सतेज पाटील यांनी केली आहे. पोटनियमातील दुरुस्त्या पाहता हा कारखाना (rajaram sahakari sakhar karkhana) खाजगीकरणाकडेच वाटचाल करत असल्याचे दिसून येतं. कारण या कारखान्यामार्फत सांगलीतील 10 ते 12 गावांचा समावेश कोल्हापूर जिल्ह्यात असणाऱ्या या कारखान्यामध्ये करण्यात येत असल्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सहकार कायद्यात कुठेही दिसून येत नाही असेही आमदार सतेज पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO 3.0: खुशखबर! आता PFचे पैसे UPI ने मिनिटात खात्यात जमा होणार, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Soft Skin Tips: मऊ आणि मुलायम त्चचेसाठी रात्री चेहऱ्यावर काय लावावे?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची eKYCची मुदत वाढवली; मंत्री आदिती तटकरेंनी सांगितली २ कारणे

Pune Rain: पुण्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपले, रस्त्यांना नदीचे स्वरूप; पाहा VIDEO

Celebrity Style Mangalsutra: सेलिब्रिटीस्टाईल शॉ्र्ट आणि युनिक मंगळसूत्र हवेत? हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT