shrimant kokate
shrimant kokate 
महाराष्ट्र

वाद पेटला; रामदास हा शिवरायांचा शिक्षक नव्हता, काेकाटे आक्रमक

साम न्यूज नेटवर्क

सातारा : राजवाडा बसस्थनाक परिसरात उभारलेले समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांचे एकत्रित असलेले शिल्प प्रशासनाने हटविले नाही तर शिवप्रेमी हे शिल्प ताेडण्यास पुढं मागे पाहणार नाहीत असा इशारा श्रीमंत काेकाटे (shrimant kokate) यांनी येथे दिला.

साता-यातील (satara) भाजप (bjp) नगरसेवक विजय काटवटे यांच्या संकल्पनेतून राजवाडा बसस्थानक येथे छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्या जीवनावर आधारित शिल्प उभारले आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी (samarth ramdas swami) यांचे एकत्रित शिल्प आहे. त्यास विविध परिवर्तनवादी संघटनांनी विराेध दर्शविला आहे. आज श्रीमंत काेकाटे यांनी संबंधित शिल्प तातडीने काढावे अशी मागणी प्रशासनास पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.

काेकाटे म्हणाले रामदास (रामदास स्वामी) हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा कधीच शिक्षक नव्हता. तरी देखील राजवाडा येथील बसस्थानकात शिवरायांना रामदास मार्गदर्शन करीत असल्याचे शिल्प उभारण्यात आले आहे. हे शिल्प काढावे यासाठी अनेक संघटनांनी जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पालिका आणि एसटी महामंडळास पत्र दिली आहेत. साेमवारी काही विघ्नसंताेषी लाेकांनी त्याचे उदघाटन केले. हा कार्यक्रम हाेणार आहे हे माहिती असून देखील आवश्यक ताे पाेलिस बंदाेबस्त देण्यात आला नाही. त्यामुळे प्रशासनाची या शिल्पास मूक संमती आहे की काय अशी शंका निर्माण झालेली आहे.

या अनधिकृत, अनएेतिहासिक शिल्प लवकरात लवकर काढावे. शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचा संदेश जनतेत जाऊ नये यासाठी शिल्प काढावाे. अन्यथा पुढील काळात कायदा व सुवव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आम्ही जबाबदार नाही असा इशारा काेकाटे यांनी दिला आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: उद्धव ठाकरे सहकुटुंब मुंबदेवीच्या दर्शनाला

Paru And Aditya Wedding : 'पारू'च्या नव्या प्रोमोने वेधलं लक्ष, पारू आणि आदित्यचं लग्न होणार पण...

Home Tips: पावसाळा येतोय! तर घरातील लाकडी फर्निचरची घ्या अशी काळजी

Lok Sabha Election: डॉ.मनमोहन सिंह आणि हमीद अन्सारी यांनी घरून केलं मतदान, वयोवृद्ध मतदारांसाठी आयोगाने केली विशेष व्यवस्था

Priyanka Gandhi : माझ्या शहीद आजी आणि शहीद वडिलांना देशद्रोही बोलल्यावर गप्प का बसू? प्रियांका गांधी कडाडल्या

SCROLL FOR NEXT