Gatari Amavasya Celebrations  Saam tv
महाराष्ट्र

Gatari Amavasya: ना चिकन ना मटण...; ग्रामस्थांनी साजरी केली अनोख्या पद्धतीने गटारी अमावस्या

आज रविवारी सकाळी गटारी अमावस्याला गावातील गटारे आणि परिसरातील स्वच्छता करून आपला स्वच्छतेचा संदेश देणारी आगळी वेगळी गटारी साजरी केली.

ओमकार कदम, साम टीव्ही, सातारा

Satara News: राज्यभरातील नागरिक आज गटारी अमावस्या साजरी करताना दिसत आहे. साताऱ्यातील सावली ग्रामस्थांनी आज रविवारी सकाळी गटारी अमावस्याला गावातील गटारे आणि परिसरातील स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश देणारी आगळी वेगळी गटारी साजरी केली. त्यामुळे सावली ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Latest Marathi News)

जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी ग्रामपंचायतील दिलेल्या स्वच्छतेच्या विकासाबाबतच्या पत्राला प्रतिसाद देत मुख्याधिकारी खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेचा जागर सावली येथे प्रत्येक रविवारी सकाळी तीन तास सुरु करण्यात आलेला आहे.

दर रविवारी सकाळी तीन तास आणि प्रत्येक मंगळवारी गावातील ग्रामस्थांनी स्वयं स्फूर्तीतून आपापला परिसर स्वच्छ करायचा असा निर्णय बैठकीमध्ये घेवून या प्रमाणे हा उपक्रम सुरू असून या उपक्रमाला हळूहळू प्रतिसाद ग्रामस्थांकडून वाढत आहे. हे स्वच्छता अभियान गावच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्यासाठी आणि स्वच्छ आणि सुंदर सावलीसाठी राबविण्यात येत आहे.

स्वच्छतेची चळवळ लोक चळवळ करण्यासाठी गावातील प्रत्येकाला याबाबत जनजागृती करून स्वयंस्फूर्तीने यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यात येत आहे. त्यामुळे यामध्ये हळूहळू सर्वांचा सहभाग वाढत असून रविवार आणि मंगळवार स्वच्छतेचा वार म्हणून त्याची ओळख होत आहे.

मांसाहाराचा शेवटचा दिवस

आज गटारी असल्यामुळे सकाळपासूनच राज्यातील अनेक भागात आखाड साजरा करायला मटण आणि चिकनच्या दुकानात गर्दी पाहायला मिळत आहे. मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर सकाळपासूनच तोबा गर्दी केल्याचे दिसून येत आहे.

यंदाच्या वर्षी अधिक महिना आणि श्रावण एकत्र येत असल्याने आजच्या दिवशी मांसाहाराचा शेवटचा दिवस असल्याने चिकन आणि मटण खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी केली आहे. आज चिकन दर हे २०० ते २२० रुपये झाले आहे. तर मटण ७०० ते ७५० रुपये किलो रुपये किलो झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लखलख चमकणारा महाराष्ट्राचा एकमेव काचेचा गणपती पुण्यात!

Diabetes : डायबिटीज होण्याआधी शरीर देतं संकेत! सकाळच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नको, लगेच तपासा ब्लड शुगर

Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, आंदोलनासाठी परवानगी मिळेल का?

घरामध्ये पैसा टिकावा आणि सुख-समृद्धी नांदावी यासाठी गणेशोत्सवात करा ‘हे’ 5 सोपे वास्तु उपाय!

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT