Gunratna Sadavarte Saam Tv
महाराष्ट्र

Satara: सदावर्तेंना पाेलिस की न्यायालयीन काेठडी? सातारा पाेलिसांची भुमिका स्पष्ट

आज सदावर्ते यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

ओंकार कदम

सातारा : बेताल वक्तव्य करणाऱ्यांना सातारा पोलिस (satara police) खपवून घेणार नाही. या प्रकरणाच्या तपासाच्या दृष्टीने गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte latest update) यांच्या पाेलीस काेठडीची मागणी करणार आहाेत असे शहर पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. (gunratna sadavarte latest marathi news)

मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोपात अटकेत असलेल्या वकील गुणरत्न सदावर्ते (gunaratna sadavarte) यांची आज (साेमवार) सातारा येथील पाेलीस काेठडी संपत आहे. यामुळे सदावर्ते यांना सातारा पाेलिस सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करणार आहेत.

सदावर्ते यांना आज पाेलीस काेठडी मिळणार की न्यायालयीन काेठडी हे दुपारीच समजेल. दरम्यान ॲड. गुणरत्न सदावर्ते व ॲड. जयश्री पाटील यांची वकिली सनद रद्द करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांच्यावतीने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT