Satara police registered a case against 30 people in connection with DJ playing on Pune-Bangalore highway Saam TV
महाराष्ट्र

Satara News: पुणे-बेंगळुरू महामार्गावर डीजेचा दणदणाट; खुन्नस देत तलवारी नाचवल्या; ३० जणांवर गुन्हा, ७ अटकेत

ओंकार कदम

Satara Crime News

सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आली आहे. साताऱ्यातील पुणे-बेंगळुरू महामार्गावर गुरुवारी रात्री डीजेचा दणदणाट पाहायला मिळाला. गौरीशंकर कॉलेज परिसरात डीजे व्यावसायिकांसह दोन गट आमने-सामने आले. यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांना खुन्नस देत तलवारी नाचवण्यात आल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

याप्रकरणी सातारा (Satara) पोलिसांनी ३० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत ७ जणांना अटकही करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बेंगळुरू महामार्गावरील गौरीशंकर कॉलेज परिसरात गुरुवारी रात्री दोन गट आमने-सामने आले.

"माझ्या डॉल्बीचा आवाज मोठा की तुझ्या डॉल्बीचा आवाज मोठा", अशी खुन्नस देत दोन्हीही गटांनी डीजेचा दणदणाट सुरू केला. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. दोन्ही गट एकमेकांना तलवारीचा धाक दाखवून खुन्नस देत असल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं.

याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी (Police) ३० जणांवर गुन्हा दाखल केला असून, दोन्ही गटातील ७ तरुणांना अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोलिसांनी अशा टवाळखोरांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

Edited by - Satish Daud Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT