Satara Police, Satara, Karad, Tasawade Toll, Video Viral, Viral Video SaamTv
महाराष्ट्र

Satara Police : तुझ्या बापाचा नाेकर आहे का ! पाेलिसाने त्याला मारली कानाखाली; Video Viral झाला ना भाऊ

या घटनेमुळे गृह रक्षक दलात नाराजी पसरली आहे.

संभाजी थोरात

Satara News : सातारा (satara) जिल्ह्यात कर्तव्यावर असताना एका पोलिसाने (police) होमगार्डला मारहाण केल्याची घटना काही दिवसांपुर्वी क-हाड तळबीड तासवडे टोलनाका (tasawade toll) येथे घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमातून (Social Media) व्हायरल (Video Viral) हाेत आहे. (Breaking Marathi News)

कराड तळबीड तासवडे टोलनाका (Karad Talbid Tasawade Toll Plaza) येथे होमगार्डला एका पोलिसाने मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने गृह रक्षक दलात प्रचंड नाराजी पसरली आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज करण्यात आला आहे. त्यावर तातडीने कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

याबाबत होमगार्डने दिलेल्या तक्रारीत 21 मार्चला सकाळी त्यांची तासवाडे टोल नाक्यावर नेमणूक होती. त्या ठिकाणी जायला वाहन न मिळाल्यामुळे कर्तव्यावर पोहोचण्यास त्यांना उशीर झाला.

वेळेत न पोचल्यामुळे तेथे नियुक्त असलेल्या हवालदार यांनी मला अर्वाच भाषेत शिवीगाळ केली. तसेच दमदाटी देखील केली.

मी त्यांना असं बाेलू नका म्हटल्यावर त्यांना मला मारहाण केली. या प्रकाराने गृहरक्षक दलामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. दरम्यान मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल हाेऊ लागला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chocolate Chip Cookies: लहान मुलांसाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी चॉकलेट चिप कुकीज, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माघ पौर्णिमा निमित्ताने पुण्याच्या खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा मंदिरात भाविकांची मांदियाळी

Chocolate Pudding Recipe : नो शुगर, नो बेकिंग; घरीच १० मिनिटांत बनवा चॉकलेट पुडिंग, बच्चे कंपनी होईल खुश

Valentine Day Gifts: गर्लफ्रेंड किंवा बायकोला करा खूश; या व्हॅलेंटाईन डेला द्या 'हे' खास गिफ्ट्स

Hair Color Care: केसांना लावलेला रंग लगेच फिकट होतो? मग या 7 टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT