Satara Breaking News, Satara Saam tv
महाराष्ट्र

Satara News : मनामती चौक गोळीबारप्रकरणी एमएम कंपनी टाेळीस माेक्का; आठ युवकांचा समावेश

या घटनेमुळे परिसरातील रहिवासी भयभीत झाले हाेते.

Siddharth Latkar

Satara Crime News : सातारा शहरातील मंगळवार पेठेत गोळीबार केल्या प्रकरणी पाेलीसांनी आमिर इम्तीयाज मुजावर (एएम कंपनी) व त्याच्या सात साथीदारांविरुद्ध माेक्का कायद्याअंतर्गत धकड कारवाई केली आहे. पाेलिस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्ह्याचा कार्यभार स्विकारल्यानंतर माेक्का अंतर्गत झालेली ही पहिलीच कारवाई आहे. त्यामुळे शेख यांनी सातारा जिल्हातील गुन्हेगारी टाेळ्यांवर कठाेर कारवाई हाेणार असे जणू संकेतच दिले आहे. (Satara Latest Marathi News)

यश संजय बीडकर हा युवका त्याच्या मित्रांबराेबर दांडिया पाहून घरी जात हाेता. त्याचवेळीस एका ठिकाणी अभिजित भिसे या युवकाने (youth) यशचा मित्र सर्वेश महाडिक याच्‍या पायावर टू व्हिलर घातली. त्यातून वाद झाला हाेता. त्यानंतर यश हा मित्रासमवेत त्‍याठिकाणाहून निघून गेला. काही वेळाने अमीर शेख, अभिजित भिसे हे त्याच्या मित्रांसह मनामती चौकात आले. तेथे यश बीडकरला पाहून अमीर शेखने पिस्तूल काढत. तुला जिवंत ठेवत नाही असे म्‍हणत शेखने यशच्‍या दिशेने गोळी झाडली. विजयादशमीच्या आदल्या रात्री दांडिया नंतर मनामती चौकात हा गोळीबार झाला हाेता.

या गुन्ह्याचा तपासात आमिर मुजावर याने कट रचून गुन्हा करण्यासाठी एएम कंपनी नावाची टाेळी सदस्यांचा वापर केला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानूसार पाेलिसांनी संशयितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये कारवाई करीता पाेलीस अधीक्षक यांच्या माध्यमातून विशेष पाेलीस महानिरिक्षक (काेल्हापूर) यांच्याकडे माेक्का (mokka) अंतर्गत प्रस्ताव दिला हाेता. त्यास मंजूरी मिळाली. (Maharashtra News)

त्यानूसार आमिर इम्तियाज मुजावर (AM कंपनी), आमिर सलीम शेख, अबु उर्फ अभिषेक राजू भिसे, साहील विजय सावंत, आहद आयुब आत्तार, आेमकार राजू भिसे, संग्राम विजय जाधव तसेच एक अल्पवयीन मुलगा यांच्यावर माेक्का कायदा अंतर्गत कारवाई झाल्याची माहिती पाेलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepali celebrities: मनीषा कोइरालापासून सुनील थापापर्यंत, या नेपाळी सेलिब्रिटींनी मनोरंजन विश्वातून जिंकली चाहत्यांची मनं

Fever: वारंवार ताप येणे 'हे' कोणत्या आजारांचे लक्षण आहे?

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; पोलिसांकडून मोठी कारवाई, ढोल ताशा पथकातील दोघांना अटक

Police Roles: राणी मुखर्जीपासून अजय देवगणपर्यंत, 'या' कलाकारांनी पडद्यावर साकारली पोलिसांची दमदार भूमिका

Skin Care: वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचं, तर घरच्या घरी करुन लावा ही पेस्ट, आठवड्याभरात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT