Satara police arrested five youths from karjat and beed. saam tv
महाराष्ट्र

Satara Police: वडूज, पुसेसावळी, मसूरच्या दराेड्यात नगर, बीडचे पाच युवक अटकेत

सातारा जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून ग्रामीण भागात छाेटे माेठ्या चाे-या हाेत हाेत्या.

साम न्यूज नेटवर्क

सातारा (satara crime news) : सातारा (satara) पाेलिसांनी वडूज (vaduj), पुसेसावळी (pusesavli) तसेच मसूर (masur) येथील दराेड्याचा तसेच दाेन घरफाेडींचा कसून तपास करुन नगर (nagar) आणि बीड (beed) जिल्ह्यातून पाच संशयितांना अटक केली आहे. या पाच ही आराेपींनी वडूज, पुसेसावळी, मसूर येथील दराेड्याची तसेच वडूज व दहिवडीतील घरफाेडीची कबूली दिल्याची माहिती पाेलिस मुख्यालयातून (satara police) देण्यात आली. (satara latest marathi news)

सातारा जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून ग्रामीण भागात छाेटे माेठ्या चाे-या हाेत हाेत्या. त्यातूनच काही ठिकाणी दराेड्याच्या घटना घडल्या. यामध्ये पाच जानेवारीस पुसेसावळी (ता. खटाव) येथील दराेड्यात एकूण ५ लाख २० हजार रुपयांचे दागिने गेल्याची फिर्याद संजय आप्पासाे कदम यांनी नाेंदवली हाेती.

दाेन मार्चला संताेषीमातानगर (मसूर) येथील पूजा वारे यांच्या घरात पडलेल्या दराेड्यात ४ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चाेरीस गेला हाेता. ११ मार्चला वडूज येथील शिवाजी भिकू ननावरे यांनी एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरीस गेल्याची तक्रार पाेलिसांत केली हाेती.

या गुन्ह्यांचा कसून तपास करावा असे आदेश पाेलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच संबंधित पाेलीस ठाण्यांना दिले हाेते. त्यानूसार एलसीबीने (local crime branch) वडूजला ज्या ठिकाणी घटना घडली तेथे भेट दिली. तेथून तपासाची चक्रे फिरवत कर्जत, बीड पर्यंत गुन्हेगारांचे धागेदाेरे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानूसार सातारा पाेलिस दलाने माहिजळगाव, कर्जत (जि. नगर) आणि आष्टी (जि. बीड) येथे जाऊन पाच संशयित आराेपींना अटक केली.

अविनाश उर्फ काल्या सुभाष भाेसले, अजय सुभाष भाेसले, सचिन सुभाष भाेसले (माहिजळगांव, कर्जत, नगर) तसेच राहूल पदु भाेसले (वाळुंज, बाबुर्डी, नगर) आणि हाेमराज काळे (वाकी, आष्टी, बीड) अशी अटक केलेल्या संशयित आराेपींची नावे आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT