satara pimpri village women take initiative for stop widow practice saam tv
महाराष्ट्र

साताऱ्यातील महिलांचे पुरोगामी पाऊल; सामुदायिक प्रतिज्ञा घेत विधवा प्रथेविरुद्ध केला ठराव

साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील पिंपरी या गावातील महिलांनी विधवा प्रथा बंदीचा नारा दिला आहे.

ओंकार कदम

सातारा : सातारा ( Satara ) जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याने अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. कोरेगाव तालुक्यातील पिंपरी या गावातील महिलांनी विधवा प्रथा बंदीचा नारा दिला आहे. गावातील महिलांनी (Women) एकत्र येत विधवा प्रथा बंद करण्यासाठी सामुदायिक प्रतिज्ञा घेऊन एकमुखी विधवा प्रथेविरुद्ध ठराव मंजूर करत महिला विधवा सोबत हळदी-कुंकू कार्यक्रम देखील घेतला. या कार्यक्रमाची राज्यभर चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमाचे राज्यातील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. (Satara Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

विधवा प्रथेविरुद्ध ठराव करणारी पिंपरी आणि कराड तालुक्यातील तांबवे ही सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत महत्वपूर्ण ठरली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड, माणगाव.सांगली जिल्ह्यातील बलगवडे.अकोला जिल्ह्यातील ढोरखेड ग्रामपंचायतींनी असा ठराव मंजूर केल्यामुळे आता प्रत्येक जिल्ह्यातून विधवा बंदी ही प्रथा बंद होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान क्रांतिसिंह नाना पाटील महिला ग्राम संघ अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या पुढाकाराने हा कोरेगाव तालुक्यातील पिंपरी गावात हा ठराव घेण्यात आला. यावेळी गावातील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. या कार्यक्रमात विधवा प्रथा बंदीचा नारा देत महिलांनी अनिष्ट रूढी परंपरा बाबत विविध दाखले देत त्यातून महिलांचे होणारे शोषण आणि रूढी कशा निर्माण होतात यावर आपले मत मांडले.

विधवा महिलांनी व्यक्त केल्या भावना

दरम्यान, 'अनेक कार्यक्रमात विधवा असल्यानं डावललं जातं. अनेक शूभकार्यात विधवांना आनंदाने सामावून घेतले जात नाही. हळद-कुंकू कार्यक्रमात जाण्यास मज्जाव केला जातो. लग्न समारंभातही पुढाकार करायला दिला जात नव्हता. त्यामुळं कार्यक्रमात जायची इच्छा होत नव्हती. मात्र, आजपासून सर्व कार्यक्रमात सामिल होणार, असे मत ललिला भोसले यांनी व्यक्त केले.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

Sunday Mega Block : रविवारी मुंबईकरांचे 'मेगा'हाल होणार, ३ मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या रेल्वेचे वेळापत्रक

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Nagarparishad Election: बारामती, फलटण, अंबरनाथसह २३ नगरपरिषद- नगरपंचायतीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; उद्या निकाल

Municipal Election : अंबरनाथमध्ये शिंदेंचे बोगस मतदार, मंगल कार्यालयात शेकडो महिला आढळल्या, भाजप-काँग्रेसचा आरोप

SCROLL FOR NEXT