phaltan news Saam Tv
महाराष्ट्र

Phaltan Doctor Death Case : फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी बातमी! गोपाळ बदनेचं आत्मसमर्पण, तपासाला वेग

Gopal Badne Phaltan : तीन दिवसांपासून फरार असलेले पोलीस अधिकारी गोपाळ बदने यांनी शनिवारी रात्री आत्मसमर्पण केले. फलटण पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी स्वतःहून हजेरी लावली.

Namdeo Kumbhar

Satara Phaltan Doctor girl Suicide news : साताऱ्यातील फलटण सरकारी रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात PSI गोपाळ बदने (Gopal Badne) याने आत्मसमर्पण केलेय. शनिवारी रात्री बदने यांनी फलटणमध्ये पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले. तीन दिवसांपासून पोलिसांकडून बदने यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. (Gopal Badne surrenders in Phaltan doctor suicide case)

गोपाळ बदने याने शनिवारी संध्याकाळी फलटण पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले. त्यानंतर फलटण पोलिसांनी वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. गोपाळ बदने याला आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. फलटण पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर गोपाळ बदने याने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. मी प्रामाणिक आहे. न्यायालय जो काही निर्णय देईल त्यावर माझा विश्वास आहे. माझा पोलीस प्रशासनावरही विश्वास आहे, असे गोपाळ बदने याने म्हटले.

फलटणमधील हॉटेलच्या खोलीत महिला डॉक्टराने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या हातावर काही मजकूर लिहला होता. पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांनी आत्महत्येसाठी कारणीभूत असल्याचे म्हटले होते. गोपाळ बदने याने आपल्यावर चारवेळा बलात्कार केल्याचाही गंभीर आरोप सुसाईड नोटमध्ये केला होता. या प्रकरणानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली. बदने याच्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला होता.

फलटण पोलीस गोपाळ बदनेच्या मागावर होते. मात्र ते गुंगारा देत फिरत होता. मोबाईल लोकेशनचा आधार घेऊन पंढरपूर बीड, पुणे आणि पंढरपूर भागात पोलिसांकडून शोधमोहीम सुरु होती. तीन दिवसानंतरही बदने पोलिसांच्या हाती लागला नाही. पण शनिवारी रात्री गोपाळ बदने स्वत:हून फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. आता त्याच्या चौकशीतून कोणती नवीन माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup PAK vs SL Super 8: सामना जिंकूनही पाकिस्तान विश्वचषकात हरला; World Cupच्या स्पर्धेतून आऊट

Israel Strike on Iran: इस्त्रायलचा इराणवर भीषण हल्ला; इराणची राजधानी तेहरान उद्धवस्त?

इराणवर अमेरीकेचा समुद्रातून वार; USS अब्राहम लिंकन युद्धनौका विध्वंस घडवणार?

Iran Vs US: अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचं प्रत्युत्तर; अमेरिकेचे एअरबेस उद्ध्वस्त

इस्त्रायल-अमेरिकेच्या निशाण्यावर अयातुल्ला अली खामेनेई; आधी धमकी आता थेट घरावर हल्ला

SCROLL FOR NEXT