Satara News Saam tv
महाराष्ट्र

Satara : वरवी पिठाची भाकरी खाल्ल्याने ७० जणांना विषबाधा; पीठ विक्रेत्यांचे दुकाने सील

Satara News : नवरात्रीचे उपवास सुरु असल्याने उपवासाचे वेगवेगळे पदार्थ करून खात असतात. त्यानुसार साताऱ्याकडे वरवीच्या पिठाची भाकरी केली जात असून हि भाकरी खाल्ल्याने काही जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे

ओंकार कदम

सातारा : सध्या नवरात्री उत्सव सुरु असल्याने अनेकांचे नऊ दिवसांचे उपवास सुरु आहेत. या उपवासासाठी अनेकजण वरवी पिठाची भाकरी करून खात असतात. अशाच प्रकारे सातारा जिल्ह्यातील मान खटाव येथे वरवी पिठाची भाकरी खाल्ल्याने गावातील अनेकांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये ६० महिला व १० पुरुषांचा समावेश आहे. सर्वांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

सातारा जिल्ह्यातील मान खटाव परिसरात हा प्रकार घडला आहे. माण- खटाव भागातील मांडवे, पळशी, दहिवडी, बोंबाळे, किरकसाल, वडूज यांसारख्या अनेक गावांमधील महिला पुरुष यांना विषबाधा झाली आहे. नवरात्र उत्सवातील उपवास असल्याने या उपवासासाठी अनेकजण फराळ करत असतात. त्यानुसार वरवी पिठाची भाकरी करून खात असतात. हि भाकरी खाल्ल्याने ६० हून अधिक महिलांना विषबाधा तर १० हून अधिक पुरुषांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 

बाधित सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु 

बाधित झालेल्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर ८ हून अधिक नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. तर वरवी पिठाची भाकरी उपवास असलेल्या लोकांनी खाऊ नये; असे आवाहन देखील आता प्राथमिक आरोग्य केंद्र कडून करण्यात येत आहे.


पिठाची विक्री करणाऱ्यांचे दुकाने सील 
नवरात्रीचे उपवास असल्याने अनेक दुकानदारांकडे वरीच्या पिठाची विक्री करण्यात येत आहे. त्यानुसार या पिठाची भाकरी खाण्यातून विषबाधा झालेल्या नागरिकांनी पीठ खरेदी केलेल्या वैभव ट्रेडर्स, अरियंत ट्रेडर्स, साई बाजार या दुकानातून स्थानिक दुकानदारांना वरीच्या पिठाचे विक्री ग्राहकांना त्याचबरोबर अन्य दुकानदारांना केली होती. या दुकानांना सील करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Government: राज्यावर पुराचं संकट; केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय

Men Periods: पुरुषांनाही मासिक पाळी येते का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

Shocking : महापालिकेच्या अतिक्रमणाच्या कारवाईमुळे तरुणाची आत्महत्या; ४ महिन्याचं बाळ झालं पोरकं

Janhvi Kapoor: जान्हवी कपूरने वरुण, सान्या, रोहितसोबत संस्कारी स्टाईलमध्ये साजरा केली नवरात्री, पाहा फोटो

Maharashtra Live News Update: बोरिवली पूलाखालील रस्त्यावर अचानक पडला मोठा खड्डा

SCROLL FOR NEXT