Urmodi Dam News Saamtv
महाराष्ट्र

Urmodi Dam News: दुर्देवी! उरमोडी धरणात दोन युवक बुडाले; पाण्याचा अंदाज न आल्याने घडला अनर्थ

Satara News Update: एका युवकाचा मृतदेह धरण पात्रातून बाहेर काढण्यात यश आले असून दुसऱ्या युवकाचा शोध सुरू आहे...

Gangappa Pujari

ओंकार कदम, प्रतिनिधी...

Satara News: सातारा जिल्ह्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. साताऱ्याच्या उरमोडी धरणात दोन युवक बुडाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामधील एका युवकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या तरुणाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्देवी घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.. (Satara Urmodi Dam News)

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील परळी येथे असलेल्या उरमोडी धरणात रविवारी दुपारी दोन युवक पोहण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने धरण पात्रातच ते बुडाले. ही बातमी रविवारी सायंकाळी युवकांच्या कुटुंबीयांना समजली. त्यानंतर त्यांनी तात्काळ ही घटना शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमला कळवली.

रात्री उशिरा अंधार असल्यामुळे शोध कार्य करताना अडथळा येत आल्याने सोमवारी सकाळी सातारा तालुका पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके तसेच शिवेंद्रसिंह रेस्क्यू टीम स्थानिक ग्रामस्थ व कातकरी यांच्या मदतीने शोध कार्य सुरू केले. (Latest Marathi News)

दरम्यान, सोमवारी सकाळी बाराच्या दरम्यान एका युवकाचा मृतदेह धरण पात्रातून बाहेर काढण्यात यश आले आहे. आणखी एक तरुण अद्याप बेपत्ता असून त्याचाही शोध घेण्याचे काम सुरू आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.. (Satara News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Airtel Recharge : खुशखबर! Airtel च्या सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये दिवसाला 4GB, अनलिमिडेट कॉलिंग, २० OTT अॅप...; लगेचच घ्या जाणून

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती|VIDEO

Weekly Horoscope: खर्चावर नियंत्रण आवश्यक असून मतभेदही टाळावे लागतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Viral Video: प्रवास मेट्रोचा, राडा मात्र गावरान, मेट्रोतील हाय-व्होल्टेज ड्रामा; हाणामारीचा व्हिडीओ पाहा

Maharashtra Live News Update: अजित दादांचा घातपात झाला आहे - भास्कर जाधव

SCROLL FOR NEXT