Satara Latest News: Saantv
महाराष्ट्र

Satara News: जावळी तालुक्यातील डोंगराला मोठ्या भेगा, भूस्खलन होण्याची भिती, गावकऱ्यांचा जीव टांगणीला

Satara Latest News: डोंगरमाथ्यावर वसलेल्या जावळी तालुक्यातील घोटेघर आणि सुलेवाडी येथील डोंगराला मोठमोठ्या भेगा पडत असल्याने येथील नागरिक भयभीत झाले आहेत.

ओंकार कदम

सातारा, ता. २७ जुलै २०२४

राज्यभरात सध्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पुराने वेढा दिला असून अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडत आहेत.अशातच सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यातील सुलेवाडी येथील डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्याने डोंगर पायथ्याच्या रांजणी गावातील नागरिक भयभीत झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, डोंगरमाथ्यावर वसलेल्या जावळी तालुक्यातील घोटेघर आणि सुलेवाडी येथील डोंगराला मोठमोठ्या भेगा पडत असल्याने येथील नागरिक भयभीत झाले आहेत. डोंगर पायथ्याशी असणाऱ्या रांजणी गावात माळीणसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने रांजणी व सुलेवाडीचे ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन मुसळधार पावसात राहत आहेत.

घोटेघर येथील सुमारे २०० ते २५० लोकवस्तीच्या सुलेवाडी वस्तीच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सुमारे २० ते २५ एकर क्षेत्राच्या शेतजमीन व डोंगर उताराला मोठमोठ्या दीड कीमी लांब व एक ते दीड फूट रुंद अशा भेगा पडल्या आहेत. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने या भेंगांमध्ये पाणी जाऊन त्या वाढू लागल्या आहेत त्यामुळे भूस्खलन होण्याच्या भीतीने रांजणीचे ग्रामस्थ भयभित झाले आहेत.

दरम्यान, २०१९ साली याच ठिकाणी डोंगराला अशाच पद्धतीने भेगा पडल्या होत्या. या वेळी शासनाने सुलेवाडी गावातील काही लोकांना तात्पुरते स्थलांतरित केले होते. तर रांजणी येथे ६० लोकांसाठी निवारा शेड उभारले होती. परंतु ती अद्याप ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिली नसल्याने अपूर्ण असल्याने ती आपत्तीग्रस्तांना दिली नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT