Koyna Dam saam tv
महाराष्ट्र

Satara News: धरणात उपलब्ध पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी राखून ठेवा, मंत्री शंभूराज देसाई यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Shambhuraj Desai News: धरणात उपलब्ध पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी राखून ठेवा, मंत्री शंभूराज देसाई यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Satish Kengar

Satara News: सातारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. संभाव्य टंचाई पाहता धरणांतील उपलब्ध पाणीसाठा हा प्राधान्याने पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी राखून ठेवावा त्याचबरोबर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणेच धरणांमधील पाण्याचे आर्वतन सोडावे, असे निर्देश मंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कालवा सल्लागार समितीची बैठक मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.

धरणांमधून पाण्याचे आवर्तन सोडताना लोकप्रतिनिधींच्या सूचनेचाही विचार करावा, अशा सूचना करुन पालकमंत्री देसाई म्हणाले, जिल्ह्यातील ज्या उपसा सिंचन योजना गळती लागलेली आहे ही गळती काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाची लवकरात लवकर बैठक घ्यावी. त्याचबरोबर तारळी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबतही बैठक घ्यावी. (Latest Marathi News)

कालव्यामधून जे पाणी सोडले जाते ते शेवटच्या शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पोहचले पाहिजे याची दक्षता घ्यावी. कोयना धरण अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेले नाही त्यामुळे पिण्याचे पाण्याचे पुनर्नियोजन करावे. उरमोडी व कण्हेर धारणांमधील सातारा शहरासाठी पाणी राखीव ठेवावे. कालव्याद्वारे पाणी सोडल्यानंतर पाणी वळविण्यासाठी कालवे फोडणा-यांवर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करावे. तसेच पोलीस विभागाने गुन्हे झालेल्या व्यक्तींवर कडक करवाई, अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी बैठकीत केल्या.

पाणी टंचाईच्या उपाययोजनांना निधी कमी पडू दिला जाणार नाही: शंभूराज देसाई

पाणी टंचाईला समोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. या विविध उपाययोजनांना शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा पाणी टंचाई आढावा बैठकीत दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanyapujan Gifts : नवरात्रीत कन्या पूजनाला द्या ६ हटके गिफ्ट्स? मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणणारे बजेटफ्रेंडली वाण

Maharashtra News Live Update: नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट

Saturday Horoscope : भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT