Satara News
Satara News Saam Tv
महाराष्ट्र

साताऱ्यात शिवसेनेला मोठं खिंडार; पुरुषोत्तम जाधव कार्यकर्त्यांसह शिंदे गटात

ओंकार कदम

सातारा - खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या विरोधात लढत देणारे शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम जाधव कार्यकर्त्यांसह शिंदे गटात शामिल झाले आहे. पुरुषोत्तम जाधव म्हणजे सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचा (Shivsena) महत्वाचा चेहरा अशी ओळख परंतु पक्षांतर्गत राजकारणामुळे काही काळा पासून राजकीय स्टेजवर दिसणारे पुरुषोत्तम जाधव (purushottam jadhav) यांनी अखेर त्यांची भूमिका जाहीर केली त्यानी सेनेला जय महाराष्ट्र करत जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांसह शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील शिवसेना आता खिळखिळी झाली आहे.

पुरुषोत्तम जाधव हे एकेकाळचे शिवसेनेचे खासदारकीचे उमेदवार होत. खा.उदयनराजे यांच्या सारख्या बलाढ्य नेत्या विरोधात निवडणूक लढवून त्यांनी शिवसेनेला जिल्ह्यात ओळख देण्याचा प्रयत्न केला होता. एकनाथ शिंदे हे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र असून आम्ही सर्व शिवसैनिक त्यांच्या पाठीमागे ठाम पणे उभे आहोत.

हे देखील पाहा -

आगामी काळात येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था सुधा आम्ही भाजप शिवसेना युतीत ताकदीने लढवणार असा विश्वास या वेळी पुरुषोत्तम जाधव यांनी यावेळी बोलत असताना व्यक्त केला. यापुढे आपली लढाई राष्ट्रवादीशी असून २०२४ मध्ये राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्यातून उच्चाटन करू, असा विश्वास ही जाधव यांनी व्यक्त केला.

साताऱ्यातील 99 टक्के शिवसैनिक हे शिंदे गटाबरोबर आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीने गेल्या अडीच वर्षात विरोधातच काम केले. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिक खचला आहे, सत्तेसाठी जी आघाडी करण्यात आली होती ती शिवसेनेला मान्य नव्हती. शिवसेनेचे सर्व भूमिपूत्र आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, असा दावा पुरुषोत्तम जाधव यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

SCROLL FOR NEXT