Shambhuraj Desai Sanjay Raut Saam tv
महाराष्ट्र

Shambhuraj Desai News: सत्‍तेसाठी राष्‍ट्रवादी, कॉंग्रेसच्‍या दावणीला बांधला गेलात; मंत्री शंभूराज देसाईंची राऊतांवर टीका

सत्‍तेसाठी राष्‍ट्रवादी, कॉंग्रेसच्‍या दावणीला बांधला गेलात; मंत्री शंभूराज देसाईंची राऊतांवर टीका

ओंकार कदम

सातारा : बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडलेले नाहीत. विचार सर्व सोडणारे तुम्ही आहात. सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसच्या दावणीला बांधला गेला. त्यामुळे कोण कुणाचा भाडेकरी आहे; हे यातून स्पष्ट होतं असल्‍याची टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केली. (Latest marathi News)

संजय राऊत यांनी मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर केलेल्या टिके बाबत त्यांनी अजून सभा झाल्यानंतर पूर्ण बोलतो. उत्तर पत्रिका एकदाच देतात मी त्यांच्या सगळ्या सर्व प्रश्नांची उत्तरं उद्या देईन; असे मंत्री देसाई यांनी सातारा येथे आले असताना म्हणाले.

भोंगा वाजणे नवीन नाही

संजय राऊत यांच्याकडून कोणतं चांगलं विधान निघेल असं कधी होत नाही. नेहमी आपण सकाळचा भोंगा वाजतो, तसा काल सकाळी आज उद्यापण वाजेल हे (Satara) काही नवीन नाही. अडीच वर्षांपूर्वी आम्ही देखील राऊतांसोबत होतो. आम्ही एकत्र काम करतो. त्यावेळेस ते म्हणायचे हे आमचे शिवसैनिक आहेत वाघाचे बछडे आहेत. राऊत यांच्या सांगण्यावरूनच पक्षात काही उलटे निर्णय झाले. जे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी निगडित नव्हते.

आम्‍ही आमची पातडी सोडणार नाही

बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब देसाई यांचे संबंध अत्यंत सलोख्याचे होते. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून कधीही बाजूला गेलो नाही. गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची मदत झाली होती. याची जाणीव आमच्या परिवाराला आहे. राऊत हे एका वर्तमानपत्राचे संपादक आहेत. त्यांनी खालची पातळी सोडली तरी आम्ही आमची पातळी सोडणार नाही; असे मत मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Neha Bora: रंगमंचापासून राजकारणापर्यंत, जवानाच्या मुलीचा Gen-Z आवाज; कोण आहे नेहा बोरा?

SCROLL FOR NEXT