Ajit Pawar On Maratha Reservation Saamtv
महाराष्ट्र

Ajit Pawar News: 'शपथ खरी करुन दाखवली...' मराठा आरक्षणाच्या निर्णयावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ajit Pawar On Maratha Reservation: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाला हात लावून समस्त लाखो मराठा जणांच्या समोर मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतली होती ती शपथ मुख्यमंत्र्यांनी खरी करून दाखवली, त्याचा सार्थ अभिमान आहे," असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

ओंकार कदम

Ajit Pawar On Maratha Reservation GR:

मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर मोठे यश आले असून मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरकारी अध्यादेश हातात पडल्यानंतर राज्यभरात मराठा बांधवांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला जात आहे. या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे.

काय म्हणाले अजित पवार?

"राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मराठा आहेत. दसरा मेळाव्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाला हात लावून समस्त लाखो मराठा जणांच्या समोर मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतली होती ती शपथ मुख्यमंत्र्यांनी खरी करून दाखवली, त्याचा सार्थ अभिमान आहे," असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

महायुती सरकारकडून धडाडीचे निर्णय...

तसेच "मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात खूप कष्ट घेतले. आरक्षणावर त्यांनी मार्ग काढला तो सर्वांना मान्य झाला. महायुतीचे (Mahayuti) सरकार अशाच पद्धतीचे धडाडीचे निर्णय घेत आहेत आगामी काळात देखील असेच निर्णय घेत राहील," असा विश्वासही अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सदावर्तेंचा पुन्हा इशारा...

एकीकडे मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarkashan) निर्णयानंतर राज्यभरात जल्लोष सुरू असतानाच मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्ते वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार हल्लाबोल करत पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. "मनोज जरांगेंचे (Manoj jarange Patil) आंदोलन का एक स्टंट आहे. जरांगेंचा अभ्यास काय? असे म्हणत लवकरच न्यायालयाचे दार ठोठावणार," असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT