Eknath Shinde, Narendra Modi Saam Tv
महाराष्ट्र

CM Eknath Shinde's Reaction : कर्नाटक विधानसभा निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधान माेदींच्या नेतृत्वाखाली...

कर्नाटक राज्यात काॅंग्रेस

संभाजी थोरात

CM Eknath Shinde In Satara : एका विधानसभेच्या निकालावरून लोकसभेचं आणि देशाचं गणित लावणं म्हणजे स्वतःची पाठ थोपटून घेण्यासारखं आहे. जनतेचा काैल मान्य करणारे आम्ही लाेक आहाेत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde reaction on karnataka election result) यांनी मरळी येथे कर्नाटकच्या निकालावर (Karnataka Assembly Election Result 2023) दिली. (Maharashtra News)

'शासन आपल्या दारी' अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दौलतनगर (मरळी) येथे झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अधिक व्यापक करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

या कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, उद्योगमंत्री उदय सामंत, उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना माध्यमांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरन छेडले असता ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र माेदी (pm modi) यांनी देशाचा नावलाैकिक जगात वाढविला आहे.

आपली अर्थव्यवस्था 11 क्रमांकावरुन पाचव्या स्थानी आणली आहे. आगामी लोकसभेची निवडणुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सगळे रेकॉर्ड मोडतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी व्यक्त केला. यावेळी शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर देखील टीका केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Diwali 2025 Shani Vakri: दिवाळीला बऱ्याच वर्षांनी होणार शनी वक्री; 'या' राशींना मिळणार शनीचा आशिर्वाद

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न; घरी बोलावून शेतकऱ्याचं सोडवलं उपोषण

Thackeray vs Shinde: शिंदे 'नरकासूर'; नरक चतुर्दशीवरून उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर विखारी टीका

SCROLL FOR NEXT