Paragliding Accident Saam TV
महाराष्ट्र

Paragliding Accident : ४०० फुटांवर गेल्यावर पॅराशूटचा बेल्ट तुटला अन्.., साताऱ्यातील तरुणासोबत घडली भयंकर घटना

पर्यटनासाठी गेलेल्या साताऱ्यातील एका तरुणाचा ४०० फुटांवरून पडून मृत्यू झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Satara Suraj Shaha Paragliding Accident : पॅराग्लायडिंग हा साहसी खेळ आहे. इथं एक चूक तुमचा जीव घेऊ शकते. याचा प्रत्यय हिमाचल प्रदेशातील कुलू जिल्ह्यातील लोकांना आला आहे. येथे पर्यटनासाठी गेलेल्या साताऱ्यातील एका तरुणाचा ४०० फुटांवरून पडून मृत्यू झाला आहे. रविवारी (25 डिसेंबर) ही दुर्देवी घटना घडली आहे. सूरज शहा (वय 30) असं मृत तरुणाचं नाव आहे. (Latest Marathi News)

सूरज हा सातारा (Satara) जिल्ह्यातील शिरवळ गावातील रहिवासी आहे. या घटनेमुळे शिरवळ शहरावर शोककळा पसरली आहे. सूरजच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. प्राप्त माहितीनुसार, सूरज आपल्या मित्रांसह नाताळाची सुट्टी साजरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशमध्ये गेला होता.

यावेळी त्याला पॅराग्लायडिंगचा मोह आवरला नाही. डोभी भागातील असलेल्या एका उंच ठिकाणावरून सूरजने चालकासह पॅराग्लायडिंगसाठी झेप घेतली. मात्र, पॅरेशूट ४०० फूटांवर असताना, अचानक बेल्ट तुटला आणि दोघेही खाली कोसळले.

दरम्यान, सूरजसोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी त्याची शोधाशोध सुरू केली. यावेळी सूरज सफरचंदाच्या एका बागेत आढळून आला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सूरजसोबत असलेल्या चालकावर सध्या उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर सूरजसोबत असणाऱ्या त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: 'सहाव्यांदा दक्षिण पश्चिमची जनता आशीर्वाद देणार..' देवेंद्र फडणवीसांना विश्वास

Camphor Benefits: घरात कापूर पाणी शिंपडल्याने होतात अनेक फायदे!

Aus vs Tasmania: ऐकावं ते नवल! १ धाव अन् ८ फलंदाज तंबूत; ७ फलंदाज तर शून्यावर बाद

Milid Devra News : वरळीत ठाकरे Vs देशपांडे Vs देवरा सामना रंगणार ?

Vastu Shastra : घरात या गोष्टी घडणे म्हणजे सुख, शांती आणि समृद्धीचे संकेत

SCROLL FOR NEXT