Chagan Bujbal News Saam tv
महाराष्ट्र

Chagan Bhujbal News: नायगावात जाळला छगन भुजबळांचा पुतळा; येवल्यातही काढण्यात आली अंत्ययात्रा

Satara News : छगन भुजबळ चले जाव, छगन भुजबळ मुर्दाबाद, मनोज जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है... अशा प्रकारची जोरदार घोषणाबाजी

Rajesh Sonwane

ओंकार कदम 
सातारा
: मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहेत. यासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून यासाठी आंदोलन उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत (Chagan Bhujbal) छगन भुजबळांनी जालना येथे केलेल्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. या विरोधात सातारा जिल्ह्यातील नायगावमध्ये (maratha Aarkshan) मराठा समाजातर्फे छगन भुजबळ यांचा पुतळा जाळण्यात आला. तर नाशिकच्या येवला येथे प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. (Breaking Marathi News)

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचा पुतळा जाळण्यात आला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव एकत्रित येऊन संपूर्ण गावांमध्ये छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची मिरवणूक काढून ग्रामपंचायत नायगाव येथे प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणा देण्यात आल्या त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा गावोगावी पेटताना दिसून येत आहे याबाबतचा घेण्यात आलेला हा आढावा.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

येवल्यात राजकीय अंत्ययात्रा
मंत्री छगन भुजबळ यांच्या पारंपारिक मतदारसंघ असलेल्या नाशिकच्या येवला मतदार संघात भुजबळांविरोधात चांगलेच वातावरण तापू लागले आहे. छगन भुजबळांनी जालना येथे मनोज जरांगे विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आज त्यांची प्रतिकात्मक राजकीय अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी छगन भुजबळ चले जाव, छगन भुजबळ मुर्दाबाद, मनोज जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है... अशा प्रकारची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली छगन भुजबळांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमा जाळण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखचं सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT