Satara Rain Update Saam TV
महाराष्ट्र

Satara Rain : साताऱ्याचा बाहुबली! चिखलात मोटारसायकल खांद्यावर घेऊन निघाला, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

Satara Flood: साताऱ्यात पावसामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था. माण तालुक्यात एका युवकाने दुचाकी खांद्यावर घेऊन ओढा पार केला. पावसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल.

Namdeo Kumbhar

ओंकार कदम, सातारा प्रतिनिधी

Satara Rain Update: दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपले आहे. अतिमुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जनजिवन विस्कळीत झाले आहे. साताऱ्यात मागील तीन दिवसांपासून आभाळ फाटल्यागत पऊस पडतोय. माण तालुक्यात मुसळधार पावसामुळे ओढे भरून वाहताय, रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. पावसामुळे एका युवकाला दुचाकी खांद्यावर घेऊन रस्ता पार करण्याची वेळ आली आहे. या साताऱ्याच्या बाहुबलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कुळकजाई गावात पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः दैना झाली आहे. रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की, एका युवकाला आपली दुचाकी खांद्यावर घेऊन रस्ता पार करावा लागला. नेहमी आपण दुचाकीवरून रस्ता पार करत असतो, मात्र कुळकजाई येथे पावसामुळे रस्ते पूर्णतः चिखलयुक्त आणि खड्ड्यांनी भरलेले आहेत. अशा परिस्थितीत वाहन चालविणे अशक्य बनले असून, नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याबाबत संबंधित विभागाने त्वरित दखल घ्यावी आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

सातारा जिल्ह्यात सध्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोयना, कृष्णा, वेण्णा यांसारख्या नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत, ज्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने शेती, घरांचे आणि रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळबागा आणि खरिपातील पिकांचेही नुकसान झाले आहे.

माण, खटाव, फलटणसारख्या दुष्काळी तालुक्यांनाही पावसाचा तडाखा बसला आहे. रस्ते बंद झाले असून, वाहतूक ठप्प झाली आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला असला, तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने पूरग्रस्तांना मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पावसाचा जोर पाहता, प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

Mhada Home: खुशखबर! म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त ५ लाखांमध्ये घर; नेमकं कुठे? अर्ज भरण्याची अंतिम तारीख कोणती?

SCROLL FOR NEXT