Satara Fire  Saam tv
महाराष्ट्र

Satara Fire : धाड धाड धाड...! साताऱ्यात भर बाजारपेठत एकावर गोळीबार, परिसरात भीतीचे वातावरण

Satara Fire News : साताऱ्यात भर बाजारपेठत एकावर गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबाराने परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे.

ओमकार कदम, साम टीव्ही, सातारा

साताऱ्यातील शिरवळ येथे भरदिवसा बाजारात दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांकडून गोळीबार

रियाज उर्फ मन्या शेख या व्यक्तीवर जुन्या वादातून गोळीबार

गोळीबाराची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, पोलिसांकडून तपास सुरू

बीडमधील सरपंचाने हवेत गोळी झाडून दहशत निर्माण केली होती, हे प्रकरणही चर्चेत

राज्यात गोळीबाराच्या घटना सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी बीडमध्ये एका सरपंचने हवेत गोळीबार केला होता. बीडमधील गोळीबाराची घटना ताजी असताना आता साताऱ्यातही गोळीबाराचा प्रकार उघडकीस आला आहे. साताऱ्यातील शिरवळमध्ये एकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. शिरवळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील शिरवळमध्ये एकावर गोळीबार झाल्याची घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या २ हल्लेखोरांकडून भर रस्त्यात गोळीबार करण्यात आला. भरदिवसा घडलेल्या घटनेने शिरवळ परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. गोळीबारात रियाज उर्फ मन्या इकबाल शेख जखमी झाला आहे. गोळीबाराची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झली आहे.

जुन्या वादातून रियाजवर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. या गोळीबारानंतर बाजारपेठेतील लोक हादरून गेले. या गोळीबारानंतर शिरवळ पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

बीडमध्ये सरपंचाचा गोळीबार

बीडच्या गेवराई तालुक्यातील रुई येथील सरपंचांकडून वाढदिवसानिमित्त एअर गनमधून हवेत गोळी झाडून दहशत पसरवण्याचा झाला. सरपंचाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणामुळे पोलिसांची वचक राहिली का, असं प्रश्न विचारले जात आहे. तर या सरंपचावर पोलीस काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारने २ वर्षीय श्रृतिकाला चिरडलं, डॉक्टरविरोधात गुन्हा; थरारक VIDEO समोर

Maharashtra News Live Update: रायगडच्या दरी-डोंगरांत धबधबे प्रवाहीत; पर्यटनाला सुरुवात

Live Location Sharing : WhatsApp, Instagram वर तुम्हीही शोधू शकता मित्रांचे लाइव्ह लोकेशन; जाणून घ्या या सोप्या ट्रिक्स

Hindu Temple Tradition: मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पायऱ्यांचा आशीर्वाद का घेतला जातो?

शिवसेनेच्या नेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू; संशय आल्याने राऊत रुग्णालयात धडकले, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT