Satara Faltan Woman Doctor Ends Life Saam
महाराष्ट्र

पोलिसांकडून बलात्कार, पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव; सातारा महिला डॉक्टर प्रकरणातील ५ मोठे खुलासे

Satara Faltan Woman Doctor Ends Life: साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहून आयुष्य संपवलं.

Bhagyashree Kamble

  • महिला डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली.

  • सुसाईड नोटमधून दोन पोलिसांवर गंभीर आरोप.

  • पीडितेच्या कुटुंबीयांकडून प्रकरणाबाबत अनेक खुलासे.

साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रूग्णालयातील महिला डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. सुसाईट नोटमध्ये महिला डॉक्टरने धक्कादायक खुलासे केले होते. त्यांनी हस्तलिखित सुसाईड नोटमध्ये दोन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून बलात्कार आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा पोलिसांशी चर्चा केली. तसेच सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी सांगितले की, 'आम्ही या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पीडितेच्या हातात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये केलेल्या आरोपांचीही आम्ही चौकशी करत आहोत'.

बलात्कार आणि मानसिक छळ

पीडितेनं महिलेनं सुसाईड नोटमध्ये दावा केला की, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांनी अनेक वेळा बलात्कार केला. तसेच लैंगिक अत्याचार केला. महिला डॉक्टरने प्रशांत बनकर याचा उल्लेख केला आहे. महिला डॉक्टरने प्रशांत बनकरवर मानसिक छळाचा आरोप केला आहे. महाराष्ट्र महिला आयोगाच्या प्रमुख रूपाली चाकणकर म्हणाल्या की, 'आम्ही या प्रकरणाची दखल घेत आहोत. सातारा पोलिसांना आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत'.

पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव

पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, पीडितेच्या नातेवाईकांनी आरोप केला की, डॉक्टरांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला होता. पीडितेच्या चुलत भावाने सांगितले की, 'खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार करण्यासाठी बहिणीवर प्रचंड पोलीस आणि राजकीय दबाव होत. माझ्या बहिणीला न्याय मिळायला हवा', अशी मागणी भावाने केली.

वरिष्ठ व्यक्तींकडून त्रास

पीडितेच्या मावशीनं दिलेल्या माहितीनुसार,'कामाच्या ठिकाणी तिच्यावर प्रचंड दबाव होता. म्हणून तिनं मोठं पाऊल उचललं. तिनं काही दिवसांपूर्वी, वरिष्ठांकडून कामाच्या ठिकाणी त्रास देत असल्याचं तिनं सांगितलं होतं', अशी माहिती पीडित महिला डॉक्टरच्या मावशीनं दिली.

आरोपी पोलीस निलंबित

सातारा पोलीस अधिक्षक तुषार दोशी म्हणाले, 'गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्याविरूद्ध बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्य़ासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे. आरोपींचा शोध सुरू आहे', अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Live Update : शिंदेंनीच ठाकरेंना पक्षातून काढलं; सुप्रीम कोर्टात सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद

Weight Loss: ट्रेडमिल की बाहेर चालणे? वजन कमी करण्यासाठी जाणून घ्या कोणता पर्याय ठरेल अधिक फायदेशीर

Maharashtra News Live Update : घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७ वर पोहचला

Beauty Tips : मानेवर चामखीळ किंवा तीळ घाण दिसतोय? या घरगुती उपायांनी करा कायमचा उपाय

Janhvi Kapoor: अश्लील फोटोप्रकरणी जान्हवी कपूरला हाय कोर्टाचा दिलासा; पण, फॅन पेजेस ब्लॉक करण्यास नकार

SCROLL FOR NEXT