Omicron  saam media
महाराष्ट्र

omicron : बेफिकीर राहू नका, यंत्रणा सज्ज ठेवा : जिल्हाधिकारी

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : ओमिक्रॉन (omicron) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह सर्व यंत्रणा प्रशासनाने सुसज्ज ठेवण्याचे निर्देश सातारा (satara) जिल्हाधिकारी शेखर सिंह (shekhar sinh) यांनी दिले. कोविड - १९ प्रादर्भाव नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबतची जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात सिंह यांनी तातडीची बैठक बाेलाविली हाेती. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी उपस्थित आराेग्य अधिकारी व अन्य विभागांच्या अधिका-यांना मार्गदर्शन केले.

सातारा (satara) जिल्ह्यात ओमिक्रॉनचे (omicron) संशयित रुग्ण हाताच्या बाेटावर माेजण्या इतपत असले तर बेफिकीर राहून चालणार नाही असे सांगत जिल्हाधिकारी शेखर सिंह (shekhar sinh) म्हणाले कारोना प्रतिबंधक पहिला डोस घेणाऱ्यांनी दुसरा डोसही प्राधान्याने घेण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावेत. ओमिक्रॉनचा धोका पाहता लसीकरणाला गती द्यावी. जिल्ह्यातील खासगी आस्थापंनामध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. जे खासगी आस्थापना नियमांचे पालन करणार नाही अशांवर दंडात्मक कारवाई करावी.

पोलीस विभागाने ज्या ठिकाणी विवाह व सार्वजनिक समारंभ होत आहे तेथे भेट देवून तपासणी करावी. नियमांचे पालन होत नसल्यास कारवाई करावी. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र पाहूनच प्रवेश देण्यात यावा. पालिका व नगर पंचायतींमधील कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण झाले आहे की नाही याची तपासणी करावी. ज्या शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लँट मंजुर केले आहेत त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्लँट कार्यान्वीत आहेत त्याची काटेकोरपणे तपासणी करावी. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.

ऑक्सिजन सिलेंडर, व्हेटीलेटर्स, रेमडेसिव्हर, बालकांना लागणारी आय.व्ही. फ्ल्यूडसचा पुरेसा साठा आरोग्य विभागाने उपलब्ध ठेवावा. तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी आत्तापासून सर्व साधन सामुग्री व आवश्यक साधनांचे योग्य नियोजन करावे. त्यासाठी आर्थिक तरतुद करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नमूद केले.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिशन पवार यांच्यासह आरोग्य विभागातील व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Peanut Chutney Recipe : नाश्त्याला बनवा शेंगदाण्याची झणझणीत ओली चटणी; डोसा,वडा,इडलीची चव वाढवेल

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

Mozambique Accident : मोठी दुर्घटना, समुद्रात बोट उलटली, ३ भारतीयांचा मृत्यू, ५ बेपत्ता

Central Railway Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडताना वेळपत्रक वाचा

OPPO Find X9 Series: येणार येणार तुमचा फोटो भारीच येणार! दमदार कॅमेरावाला OPPO Find X9 Series च्या लॉन्चची तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT