ख्रिसमस, नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्याला निघालात? हे वाचा

काेराेनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नवे नियमांची अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे.
way to lonavala
way to lonavala
Published On

लाेणावळा : नाताळ (christmas) आणि ३१ डिसेंबरच्या सुट्ट्यांसाठी लोणावळ्यात (lonavala) जाण्याचा विचार करत असाल तर थांबा. या पर्यटनस्थळी केवळ काेविड १९ प्रतिबंधक (covid19 vaccine) लसीचे दोन डोस घेतलेल्या पर्यटकांना (tourist) प्रवेश दिला जाणार आहे. येणा-या पर्यटकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे.

याबाबत सीताराम दुबल (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणावळा शहर) आणि सोमनाथ जाधव (मुख्याधिकारी, लोणावळा पालिका) यांनी संयुक्तरित्या पर्यटकांसाठी (tourist) हे आवाहन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केवळ लसीचे (vaccine) दोन डोस पुर्ण झालेल्यांनाच शहरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी पथकाच्या माध्यमातून लोणावळ्यात (lonavala) येणा-यांचे दोन डोस घेतले असल्याचे प्रमाणपत्र बघितले जात आहे.

way to lonavala
फिरकीपटू एजाज पटेलला न्यूझीलंड संघातून वगळलं; लॅथम कर्णधार

पालिका आणि पाेलिसांनी हॉटेलमध्ये देखील लसीचे दोन घेतलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा अशा सूचना व्यावसायिकांना दिल्या आहेत. लोणावळा पालिकेचे पथके सर्वांना याची कल्पना देत लक्ष ठेवून आहे. याबराेबरच लोणावळा येथे १५० पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे असे दुबल यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com